Allow shops up to seven 
कोल्हापूर

दुकानांना सातपर्यंत परवानगी द्याः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी

कोल्हापूर ः राज्य सरकारने 31 मे रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्वच दुकाने, व्यापारी आस्थापनांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. जिल्ह्यातही याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी चेंबर्स ऑफ कॉमर्सने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. 
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, मिशन बिगिन अगेन, अनलॉक 1 या शासनाने काढलेल्या परिपत्रकात अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक व्यापारी आस्थापने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील व्यापारी आस्थापनेदेखील सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, तसेच जिल्ह्यामध्ये व्यापारी आस्थापने चालू करत असताना खालील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याची कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे कोल्हापूर व्यापाऱ्यांच्या वतीने हमी दिली आहे. 
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार व संजय पाटील, मानद सचिव वैभव सावर्डेकर, संचालक अजित कोठारी व तौफीक मुल्लाणी तसेच जयंतकुमार गोयानी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी घ्यावयाची काळजी 
- मालक-कर्मचाऱ्यास मास्क अत्यावश्‍यक 
- दुकानाबाहेर मीटरचे चौकोन आखावेत 
- मास्क लावलेल्या ग्राहकांना सॅनिटायझर देऊन प्रवेश 
- काऊंटर व ग्राहक यांच्यात एक मीटरचे अंतर 
- दुकान नेहमी सॅनिटायझर करून स्वच्छ ठेवणे 
- कर्मचार्यांसाठी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घेणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Controversy : चाकणकरांनी अमावस्येला बोट कापून घेतलं ? सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत केला काळ्या जादूचा आरोप

Nainital Travel: उन्हाळ्यात गुलाबी सरप्राइज हवंय? जापनीज चेरी ब्लॉसमचा नैनीतालमध्ये 'मॅजिक' शो ; नक्की भेट द्या

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

स्टार प्रवाहच्या 'या' अभिनेत्याला रितेशनं केला स्वत:हून फोन, आनंद व्यक्त करत म्हणाला...'रितेश सरांचा स्वत:हून फोन आला आणि...'

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT