Allowance For Anganwadi Staff By Gadhinglaj Panchayat Samiti Kolhapur Marathi News
Allowance For Anganwadi Staff By Gadhinglaj Panchayat Samiti Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज पंचायत समितीतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भत्ता

अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोना काळात काम केलेल्या आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता जमा केला आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या शेष फंडातून तीन लाख 72 हजार 500 रुपयांचा निधी दिला आहे. तालुक्‍यातील 745 आशा-अंगणवाडी कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला आहे. अशा प्रकारे प्रोत्साहन भत्ता देणारी गडहिंग्लज पंचायत समिती एकमेव आहे. 

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. दिवसागणिक रुग्ण संख्या वाढू लागली. त्याचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरु केले. या कामाची जबाबदारी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर सोपविली होती. स्वत:चा जीव धोक्‍यात घालून कोरोना संसर्गाच्या काळात रोज 100 कुटुंबांना भेटी दिल्या जात होत्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान होते. 

समाजासाठी अत्यंत गरजेच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत येथील पंचायत समितीने प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. पंचायत समिती सभेत त्याबाबतचा ठरावही करण्यात आला होता. 

भत्ता देणारी एकमेव पंचायत समिती 
दरम्यान, प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे तीन लाख 72 हजार 500 रुपयांची तरतूद केली. त्यासाठी पंचायत समितीच्या शेष फंडातून निधी उपलब्ध केला आहे. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नुकताच हा निधी वर्ग केला आहे. कोरोना काळात केलेल्या कामापोटी अशा प्रकारे प्रोत्साहन भत्ता देणारी गडहिंग्लज पंचायत समिती एकमेव आहे, हे विशेष. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT