Although Corona was cured, she needed three months of care 
कोल्हापूर

कोरोना बरा झाला तरी  तीन महिने काळजी घेण्याची गरज 

सदानंद पाटील

कोल्हापूर  : कोरोनामुक्‍त झाल्यानंतर खरी लढाई सुरू होते, ती पूर्वीप्रमाणे जनजीवन सुरळीत होण्याची. संपूर्ण मानसिक स्वास्थ्य सांभाळून पूर्वीच्याच ऊर्जेने, ताकतीने व मन प्रसन्न ठेवून जगणे हे संबंधित व्यक्‍ती व त्याच्या कुटुंबांसमोर मोठे आव्हान आहे. कोरोनामुक्‍त झाल्यानंतर बहुतांश रुग्णांना विविध त्रासांनी ग्रासले आहे. यात रक्‍तात गुठळ्या होणे, अस्वस्थता, अशक्‍तपणा जाणवणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकटेपणा. कोरोनाचे हे साईड इफेक्‍ट हे कोरोनामुक्‍त झाल्यानंतर पुढील तीन महिने राहतात. त्यामुळे घाबरुन न जाता डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास या परिस्थितीतूनही बाहेर येण शक्‍य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या ही 44 हजारांवर पोहचली आहे. कोरोनामुक्‍तांची संख्याही 33 हजारांवर गेली आहे, मात्र मध्यम व तीव्र लक्षणे असणाऱ्या व एकापेक्षा अधिक आजार असणाऱ्या कोरोनाबाधितांना मात्र कोरोनामुक्‍त झाल्यानंतर विविध त्रास होतात. 
बरे झाले तरी अशक्‍तपणा जाणवतो. नियमित काम करताना थकवा जाणवतो. दोन तीन महिने हा त्रास राहतो. रक्‍तात गुठळ्या होतात. त्या शरीराच्या कोणत्याही भागात अडकून तिथे विविध आजार होण्याची शक्‍यताही असते. 
शरीरातील ऑक्‍सिजन पुरवठा कमी झाला तर मेंदूचे आजार बळवण्याची शक्‍यता असते. याचा परिणाम रुग्णाच्या मानसिक स्थितीवर होतो. त्यामुळे मानसिक संतुलन जपण्यासाठी रुग्णासह कुटुंबाचे योगदान मोठे राहते. कोरोनामुक्‍त व्यक्‍तींची चिडचिडही होते. यावेळी रुग्णाला मानसिक आधार देणे, त्याला एकाकी वाटणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

कोरोनामुक्‍त झाल्यानंतर अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो. यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे, लिंबू सरबत, ओआरएस असे द्रवयुक्‍त पदार्थ जेवढे जास्त घेतले जातील तेवढा त्रास कमी होतो. प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी व झिंक आदी औषधे घेतल्यास ती शरीराला उपयुक्‍त ठरतात. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम अत्यावश्‍यक आहे. यात मात्र डॉक्‍टरांचा सल्ला अनिवार्य आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 


कोरोना रुग्णांत रक्‍तात गुठळ्या होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने रक्‍त पातळ होण्याच्या गोळ्या घ्यावा लागतात. तसेच फुफ्फुसाचे आजार, ऑक्‍सिजन पातळी कमी-जास्त होण्याचा त्रासही होण्याची शक्‍यता असते. रुग्णनिहाय वेगवेगळ्या तक्रारी आहेत. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन घेउन रुग्णांना कोरोनाच्या साईड इफेक्‍टमधून बाहेर येणे शक्‍य आहे. 
- डॉ.आनंद कामत, आनंद नर्सिंग होम, कोविड सेंटर. 

दृष्टीक्षेपात 
*एकूण कोरोनाबाधित रुग्ण-- 43777 
*एकूण कोरोनामुक्‍त संख्या--- 32749 
*एकूण मृत्यू --------- 1398 
*सध्या उपचार घेत असलेले---9630
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे जिल्ह्यातील १६ धरणे १०० टक्के भरली; खडकवासला, माणिकडोहचा पाणीसाठा सर्वात कमी

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठी घडामोड

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका फायनल किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या नवी मुंबईतील हवामानाचा अंदाज

Gold Rate Today : तुळशी विवाहादिवशी सोने झाले आणखी स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Soybean Procurement Nagpur: अखेर हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त ठरला; पोर्टल सुरू, नऊ केंद्रांना मंजुरी, सोमवारपासून नोंदणी

SCROLL FOR NEXT