Amal Mahadik Satej Patil  sakal
कोल्हापूर

Rajaram Sugar Factory : सतेज पाटलांच्या गटाचा 'कंडका' पाडत 'राजाराम'च्या अध्यक्षपदी अमल महाडिक

सत्तारूढ आघाडीने एकतर्फी सत्ता मिळवत आमदार सतेज पाटील (Satej Patil) गटावर मात केली.

सकाळ डिजिटल टीम

खासदार धनंजय महाडिक यांनी उसाचे दोन तुकडे करत विरोधकांचाच कंडका पाडल्याचे सुचित करून दिले.

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Chhatrapati Rajaram Sugar Factory) अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) आणि उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर उदय उपले यांनी सहायक अधिकारी म्हणून काम पाहिले.

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर कारखाना परिसरात ध्वनिक्षेपकावर लावलेल्या गाण्यांच्या तालावर नूतन अध्यक्ष अमल महाडिक यांनीही ठेका धरला. गुलालामध्ये रंगलेल्या कार्यकर्त्यांनी महाडिक यांच्या जोरदार घोषणा दिल्या, तर खासदार धनंजय महाडिक यांनी उसाचे दोन तुकडे करत विरोधकांचाच कंडका पाडल्याचे सुचित करून दिले.

आरोप-प्रत्यारोप, सत्तारूढ-विरोधी गटाकडून वैयक्तिक पातळीवरील टीकेमुळे राजाराम कारखान्याची निवडणूक राज्यभर गाजली. माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सत्तारूढ आघाडीने एकतर्फी सत्ता मिळवत आमदार सतेज पाटील (Satej Patil) गटावर मात केली. सत्तारूढ गटाकडून निवडणूक प्रचार, यंत्रणा किंवा याबद्दलचे सर्व नियोजन अमल महाडिक यांनी सक्षमपणे पेलले. त्यामुळे यावर्षी अध्यक्षपदाची माळ अमल महाडिक यांच्या गळ्यात पडणार होती.

त्यानुसार काल त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, तर कसबा बावडा येथील नारायण जाधव यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, विश्वजित महाडिक, सत्यजित कदम उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आभार मानले.

कारखाना अध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली जाईल. सर्वांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सभासद हिताचे निर्णय घेऊन राजाराम कारखान्याचे नाव उज्ज्वल केले जाईल. कारखान्याच्या उत्कर्षासाठी व प्रगतीसाठी, सभासद, शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणुकीवेळी दिलेल्या वचनाप्रमाणे कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणी करून गळीत क्षमता ५००० टनापर्यंत केली जाईल. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त ऊसदर देण्यासाठी कटिबद्ध राहू.

-अमल महाडिक, नूतन अध्यक्ष

‘अन्य संचालकांना उपाध्यक्षपदाची संधी द्या’

प्रत्येक वर्षी एका संचालकाला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळावी. कारखान्याचा कारभार कसा असतो, याची माहिती करून द्यावी, यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी इतर संचालकांनाही उपाध्यक्ष म्हणून कामाची जबाबदारी द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT