Ambabai Jyotiba temples are now open for eight hours 
कोल्हापूर

अंबाबाई, जोतिबा मंदिरे आता आठ तास खुली

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरे आता दररोज आठ तास भाविकांना दर्शनासाठी खुली राहणार आहेत. सकाळच्या सत्रात दोन तासांनी वेळ वाढवली असून, आता सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. सायंकाळच्या सत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच चार ते सात या वेळेत दर्शन मिळेल. दरम्यान, याबाबतचा निर्णय आज देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला. देशभरातील भाविकांना दर्शनासाठी मोफत ई-पासची सुविधाही आजपासून उपलब्ध झाली आहे.


आठ महिन्यांनंतर दिवाळी पाडव्यादिवशी मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली केली. मात्र, गेल्या आठवड्यात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेऊनच भाविकांना दर्शन दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात सकाळच्या सत्रात नऊ ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना दर्शन दिले गेले. आता ही वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय देशभरातून येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, या उद्देशाने समितीच्या अधिकृत वेबसाईटवर मोफत ई-पासची सुविधा उपलब्ध झाली आहे.

त्यासाठी संबंधित भाविकांना वेबसाईटवर जाऊन दर्शनासाठीचा फॉर्म भरावा लागेल. आवश्‍यक ती सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित भाविकांना ई-पास दिला जाईल. अशा भाविकांसाठी मंदिरात दर्शनासाठी स्वतंत्र रांग केली जाणार असून, जिल्ह्यातील भाविकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी www.mahalaxmikolhapur.com या वेबसाईटवर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. बैठकीला समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, अभियंता सुदेश देशपांडे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक सर्व नियमांचे पालन करीतच भाविकांना दर्शन दिले जात आहे. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, या उद्देशाने समितीच्या अधिकृत वेबसाईटवर मोफत ई-पासची सुविधा उपलब्ध केली आहे. 
- महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

संपादन अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT