ambabai mandir open from tomorrow vestryish visit to temple in kolhapur 
कोल्हापूर

Video : आई अंबाबाई कोरोना जाऊ दे म्हणत भाविकांनी घातले साकडे ; अंबाबाई दर्शनासाठी भक्तांची रिघ

मतीन शेख

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेले करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाले आहे. सकाळी ९ वाजता मंदिराची दरवाजे भक्तांसाठी खुली करण्यात आली. अनेक दिवसानंतर दर्शन होणार असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळी मंदिरात होमहवन झाले. त्यानंतर दर्शनाला सुरवात झाली. मंदिरात भाविकांच्या स्वागतासाठी रंगबेरंगी फुलांच्या कमानी उभ्या केल्या गेल्या आहेत. भाविकांमुळे मंदिर परिसरात चैतन्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांना अंबाबाई मंदिरात कासव चौकातूनच दर्शन दिले जात आहे. आठ दिवसांनंतर महाद्वार दरवाजामार्गे मुखदर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे.

मास्क न घालणाऱ्या भाविकांवर दंडात्मक कारवाई होणार असून सोशल डिस्टन्ससाठी दर्शनरांगेची नेटकी व्यवस्था केली गेली आहे. लहान मुले, गरोदर महिला व पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना दर्शनासाठी परवानगी मज्जाव करण्यात येत आहे.

महाराष्ट्रभरातून दर्शनासाठी भाविक दाखल

कोरोनाच्या संसर्गाची भिती लक्षात घेता शासनाने मंदिरे बंद ठेवली होती परंतू दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर आज मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.नवरात्रित भाविकांना बाहेरुन दर्शन घ्यावे लागले.अंबाबाई मंदित आज खुले होणार असे समजतात मुंबई, पुणे, अहमदनगर, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातून भाविकांनी कोल्हापूरची वाट धरली आहे. आठ महिन्यापासून थांबलेल्या दर्शनाचे वेध त्यांना लागले आहेत.

आई अंबाबाई कोरोना जावु दे

कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले. अनेक जीव गेले. भाविक दर्शना निमित्त श्री. अंबाबाईकडे 'कोरोना महामारी लवकर नष्ट होवु दे...' असे साकडे या दर्शना निमित्त घालत आहेत.

अशी आहे दर्शनाची व्यवस्था

 • पूर्व दरवाजाजवळ मंडपाची ऊभारणी केली आहे. मंडपात सॅनिटायझेशन सुविधेसह वीज व पंख्यांची सुविधा आहे. या दरवाजातून एका वेळी २५ याप्रमाणे भाविकांना मंदिरात सोडण्यात येते. दोन भाविकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जात आहे. दर्शन घेतल्यानंतर दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर पडण्याची व्यवस्था आहे.

• सॅनिटायझेशन व थर्मल स्कॅनिंगनंतरच भाविकांना दर्शनरांगेत प्रवेश दिला जातो. सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत दर्शन उपलब्ध होणार आहे.

• सुरुवातीचे आठ दिवस केवळ दर्शन मिळणार असून मंदितार ओटी, हार-फुले नेण्यास मनाई आहे. तसेच भाविकांसाठी अभिषेक व अन्य पूजा होणार नाहीत.

• मंदिराजवळ अत्यावश्‍यक सेवेसाठी रुग्णवाहिका व तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम कार्यरत असेल.

• बाहेरगावच्या भाविकांसाठी मोफत ऑनलाईन बुकिंगची सुविधा करून त्यांना प्राधान्याने; पण दर्शनरांगेतूनच दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच फेसबूक,देवस्थानच्या वेबसाईटवर लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

• दिवसभरात अडीच ते तीन हजार भाविकांना दर्शन होईल असे नियोजन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT