ambabai temple are open for today in kolhapur restrict to time for visit 
कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले ; निश्चित वेळेत मिळणार दर्शन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री जोतिबासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील तीन हजार ४२ मंदिरे आजपासून दर्शनासाठी खुली होणार आहेत. मात्र, सर्व मंदिरांत सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी चार ते सात या वेळेतच भाविकांना दर्शन घेऊ दिले जाणार आहे.

मास्क न घालणाऱ्या भाविकांवर दंडात्मक कारवाई होणार असून सोशल डिस्टन्ससाठी दर्शनरांगेची नेटकी व्यवस्था केली जाणार आहे. लहान मुले, गरोदर महिला व पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना दर्शनासाठी परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती आज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री अंबाबाई व जोतिबा मंदिरात सकाळी साडेनऊ वाजता होमहवन होणार असून भाविकांच्या स्वागतासाठी फुलांच्या कमानी उभ्या केल्या जाणार आहेत. सुरुवातीला कोरोनायोद्धा भाविक व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना दर्शनासाठी प्राधान्य दिले जाणार असून अंबाबाई मंदिरात कासव चौकातूनच दर्शन घेता येणार आहे. आठ दिवसांनंतर महाद्वार दरवाजामार्गे मुखदर्शनाची व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सहसचिव शीतल इंगवले, जोतिबा देवस्थानचे महादेव दिंडे आदी उपस्थित होते. 

श्री अंबाबाईचे असे मिळेल दर्शन...

- पूर्व दरवाजाजवळ मंडप. मंडपात सॅनिटायझेशन सुविधेसह वीज व पंख्यांची सुविधा. या दरवाजातून एका वेळी २५ याप्रमाणे भाविकांना मंदिरात सोडण्यात येईल. दोन भाविकांमध्ये सहा फुटांचे अंतर असेल. दर्शन घेतल्यानंतर दक्षिण दरवाजातून भाविक बाहेर पडतील.

- सॅनिटायझेशन व थर्मल स्कॅनिंगनंतरच भाविकांना दर्शनरांगेत प्रवेश. सकाळी साडेअकरा व सायंकाळी साडेसहाला दर्शनरांगेत भाविकांना उभे राहता येणार नाही. 

- सुरुवातीचे आठ दिवस केवळ दर्शन मिळणार असून ओटी, हार-फुलांना मनाई असेल. भाविकांसाठी अभिषेक व अन्य पूजा होणार नाहीत.

- अत्यावश्‍यक सेवेसाठी रुग्णवाहिका व तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम कार्यरत असेल.

- बाहेरगावच्या भाविकांसाठी मोफत ऑनलाईन बुकिंगची सुविधा करून त्यांना प्राधान्याने; पण दर्शनरांगेतूनच दर्शनाची सुविधा.

- दिवसभरात अडीच ते तीन हजार भाविकांना दर्शनाचे नियोजन.

- मंदिराच्या आवारातील दुकाने सुरुवातीचे काही दिवस बंदच राहणार.

कर्मचाऱ्यांसाठी विमा

देवस्थान समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांतील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरवला जाणार आहे. सर्व मंदिरांसाठी दर्शनासाठीचे नियम सारखेच असून पुढील नियमावली जाहीर होईपर्यंत या नियमांचे सर्व मंदिर व्यवस्थापनांनी पालन करायचे आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग बळावू नये, यासाठी सुरवातीचे काही दिवस मर्यादित काळासाठी मंदिरे खुली राहणार असून हळूहळू हा कालावधी वाढवला जाणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT