jewelery
jewelery sakal
कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात महिलेच्या साडेदहा तोळे दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: अंबाबाई मंदिरातील दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविक महिलेची साडे दहा तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्याने हातोहात लंपास केली. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ललिता उपाध्ये या बेळगाव येथील रायबाग तालुक्यात राहतात. त्या रविवारी (ता.२०) मुली आणि नातेवाईकांसह श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी कोल्हापुरात आल्या होत्या. सुट्टीचा दिवस असल्याने दर्शनास गर्दी होती. त्या नातेवाईकांसह सायंकाळी मंदिराच्या पश्चिम दरवाज्या समोरील दर्शन रांगेत उभ्या होत्या. त्यांच्या हतात पांढऱ्या रंगाची पर्स होती. त्यामध्ये त्यांनी दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच तोळ्याचे गंठन आणि साडेतीन तोळ्याचे गंठन असे साडे दहा तोळ्याचे दागिने ठवले होते. चोरट्याने ही पर्स हातोहात लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपाध्ये यांनी याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. त्यानुसार पोलिस ठाण्यात तीन लाख ६० हजार रूपये किमंतीचे दागिने चोरीला गेल्याची नोंद झाली. पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसी टीव्हीची मदत घेतली जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT