कोल्हापूर

अंबाबाई मंदिर देवस्थानची व्यवस्था; यंदा पहिल्यांदाच तांत्रिक साधनांचा वापर

ड्रोन, डोअर डिटेक्टरच्या कॅमेऱ्याची नजर

बी. डी. चेचर

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिर परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने २४ तास पहारा ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतानाच प्रत्येक भाविक मेटल डिटेक्टरच्या कॅमेऱ्यातून स्कॅन होणार आहे. गर्दीवर नियंत्रणासह सुरक्षिततेच्या कारणावरून ही व्यवस्था पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात येत आहेत.

नवरात्रोत्सवात लाखो भाविक करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत रांगा लागतात. पालखी सोहळा, पंचमी, अष्टमी, नगरप्रदक्षिणा, दसरा अशा महत्त्वाच्या दिवशी तर भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होते. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव होत असल्याने यंदा मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच प्रशासनातर्फे नियोजन केले आहे. नवरात्रोत्सवातील नियोजनासाठी देवस्थान प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, उपअभियंता सी. एस. पाटील यांच्याकडून सुरू झाले आहे. सीसीटीव्ही सुरक्षा नियंत्रक राहुल जगताप व सहाय्यक अभिजित पाटील यांनी याचे प्रशिक्षण घेतले आहे.

भाविकांकडून दरवाज्यासाठी १२ लाखांचे सागवानी लाकूड

चेन्नईतील एका भाविकांने १२ लाखांचे सागवानी लाकूड अंबाबाई मंदिरातील दरवाज्यासाठी दिले आहे. दरवाज्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याला चांदीने सजवले जाणार आहे. त्यासाठी भाविकांनी देवस्थान समितीकडे दान केलेली ३६० किलो चांदी वापरली जाणार आहे. अंबाबाई मंदिरातील पितळी व गाभाऱ्याच्या चौकटीला लावला जाणाऱ्या चारही दारांच्या बाह्य बाजूला ६० किलो चांदी वापरली जाईल. शिवाय चारही दारांच्या पाठीमागील बाजूस प्रत्येकी ३० किलो चांदीचा पत्रा लावला जाणार आहे.

मंदिर परिसराची स्वच्छता

नवरात्रोत्सव १० दिवसांवर आला असून, अंबाबाई मंदिरांसह नवदुर्गा मंदिरात तयारीला प्रारंभ झाला आहे. मंदिराच्या दीपमाळा, गरूड मंडप आणि महाकाली मंदिराची स्वच्छता आज केली. मुंबई येथील संजय मेंटेनन्स कंपनीच्या २० जणांच्या टीमकडून आजपासून स्वच्छतेस प्रारंभ झाला. अंबाबाई मंदिरात स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर विद्युत जोडण्यांची चाचणी घेतली जाणार आहे. देवीच्या अलंकारांसह गाभाऱ्याची स्वच्छता लवकरच होणार आहे. पूर्व दरवाजाच्या बाजूने दर्शन मंडप उभारला जाणार असून, तेथे महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असतील. त्याशिवाय दर्शन मंडपात एलईडी स्क्रीनसह पंखे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT