ambulance set fire ambulance outside the belgum district hospital after an infected patient died during treatment Corona ward 
कोल्हापूर

VIDEO : संशयित रुग्णाच्या मृत्यूमुळे बेळगावात संतप्त जमावाकडून रुग्णालयावर तुफान दगडफेक, रुग्णवाहिकाही पेटवली

अमृत वेताळ

बेळगाव - सिव्हिलमधील कोरोना विभागात उपचारादरम्यान बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने जिल्हा रुग्णालयाबाहेरील रुग्णवाहिका पेटवून धुडगूस घातला. यावेळी बिम्ससमोरील सहा खासगी वाहनांवर तुफान दगडफेक करून तोडफोड केली. इतकेच नव्हे, तर कोरोना विभागातील  डॉक्‍टर, परिचारिका आणि वॉर्डबॉयनाही मारहाण करण्यात आली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरासह आरोग्य विभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्त  डॉ. के. त्यागराजन व जिल्हाधिकारी हिरेमठ व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालयात  कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेडची कमतरता भासत असल्याने नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे अनेकांचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांबरोबर वादाचे प्रसंग घडत आहेत. उपचाराविना अनेकांना रुग्णालयाबाहेर आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडत आहेत.

व्हिडीओ पाहा...

कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोपही सातत्याने करण्यात येत आहे. शहरातील एका रुग्णावर कोरोना विभागात उपचार सुरू होते. मात्र सदर रुग्णाचा आज रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त जमावाने जिल्हा रुग्णालयाबाहेर थांबलेल्या रुग्णवाहिकेला पेटवून दिले. सदर रुग्णवाहिका अथणी येथील एका कोरोनाबाधित रुग्णाला घेऊन आली होती. त्याचबरोबर  जमावाने जिल्हा रुग्णालयात थांबलेल्या अन्य  सहा खासगी चार चाकी वाहनांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये पोलिस व आरोग्य खात्याच्या वाहनांवर दगडफेक झाली. त्यामुळे वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. इतकेच नव्हे तर कोरोना विभागात सेवा बजावणाऱ्या डॉक्‍टर, परिचारिका तसेच वार्डबॉयना देखील मारहाण करण्यात आली. त्यामुळे भीतीपोटी सर्वांनी तेथून पलायन केले. रुग्णावाहिकेने पेट घेताच रुग्णालय आवारात सर्वांची तारांबळ उडाली. काहीही माहिती समजत नसल्याने परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. एपीएमसी पोलिसांना याची देण्यात आली. पोलिस येण्यास उशिर झाल्याने तोपर्यंत जमावाने मोठे नुकसान केले. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिरेमठ, पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, यशोदा वंटगुडी यांच्यासह शहरातील बहुतेक पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी आग्निशामक दलाने येऊन रूग्णवाहिकेची आग आटोक्‍यात आणली.

जिल्हा रुग्णालयाबाहेर उभी असलेली रुग्णवाहिका पेटवून देण्याबरोबरच काही इतर वाहनांवरही दगडफेक करून तोडफोड करण्यात आली आहे. ३० ते ४० जाणांनी हे कृत्य केले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रुग्णालयातही घुसण्याचा प्रयत्न झाला.
- डॉ. के. त्यागराजन
पोलिस आयुक्त
 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT