And people on the streets screaming for helpkolhapur marathi news 
कोल्हापूर

आणि लोक जीवाच्या आकांताने ओरडत रसत्यावर

सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक : महिनाभर नीरव शांतता अनुभवत असलेल्या भोगावती कारखाना स्थळावरील नागरिकांना काल रात्री एका स्फोटाने हादरवून टाकले. दत्त मंदिराच्या बाजूला असलेल्या दगडाच्या खाणीत अचानक सुरुंगाचा स्फोट झाल्याने लोकांची अक्षरशः भंबेरी उडाली. कानठळ्या बसविणारा आवाजामुळे जीवितास धोका असल्याने शंभरवर लोकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.

भोगावती कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर दगडाची खाण होती. उत्खनन बंद ठेवले होते; मात्र काल अचानक भूसुरुंग लावून खाणीतील दगड काढण्याचा प्रकार झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रचंड स्फोटाच्या आवाजामुळे कॉलनीसह कारखाना परिसरातील नागरिक हादरून गेले. घरातून सगळेच बाहेर रस्त्यावर ओरडत आले. परिते (ता. करवीर) येथील दोघांनी हे कृत्य केल्याचे पुढे आले. त्यांच्या विरोधात आज नागरिकांनी जिल्हाधिकारी व तहसीलदाराकडे तक्रार केली.

निवेदनावर किरण पाटील' संग्राम पाटील' संदीप पाटील आदी सत्तरवर लोकांच्या सह्या आहेत. 
याबाबत मंडल अधिकारी धनाजी कलिकते यांच्याशी संपर्क साधला असता लॉकडाउनच्या काळात कोणत्याच उत्खननाला परवानगी दिलेली नाही. यामुळे नेमके काय घडले आहे याची चौकशी करून योग्य निर्णय घेऊ असे सांगीतले. 

लोक ओरडत रस्त्यावर 
खाण परिसरात लोकवस्ती असल्याने उत्खनन बेकायदेशीर ठरवून खाण बंद केली आहे; मात्र अचानक रात्री झालेल्या स्फोटाने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. स्फोट इतका मोठा होता की याच्या आवाजाने प्रत्येक घरातील लोक ओरडत रस्त्यावर आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT