Angry villagers dumped two dead pigs in the sarpanch sub sarpanch cabin 
कोल्हापूर

म्हणुन लोकांनी सरपंचाच्या खोलीतच टाकली मृत डुकरे....

सकाळवृत्तसेवा

कबनूर (कोल्हापूर) - येथील आझादनगर मुजावर गल्ली येथे एका नागरिकाने बेकायदेशीर डुकरे पाळली आहेत.त्यातील काही डुकरे सकाळी सातच्या सुमारास मेली.त्या कारणावरून डुकरे पाळणारा आणि त्या भागातील नागरिकांची वादावादी झाली.

नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला आपल्या भागात डुकरे मेली आहेत.डुकरे पाळणाऱ्यांने मेलेली डुकरे  आमच्या दारात टाकली असून दुर्गंधी सुटली आहे. डुकरे पाळणाऱ्यांवर कारवाई करावी व मृत डुकरे हलवावीत असे सांगितले.तथापि ग्रामपंचायतीने त्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा असे त्या भागातील  नागरिकांना सांगितले.नागरिकांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी ग्रामपंचायतकडे तक्रार करा असे सांगितले.त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील सरपंच व उपसरपंच केबिनमध्ये दोन मृत डुकरे टाकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.नागरिकांनी मृत डुकरे पाहण्यासाठी गर्दी केली.

येथे एका नागरिकांने बेकायदेशीर डुकरे पाळली आहेत.त्याबाबत भागातील नागरिकांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे.आज सकाळी सात वाजता आझादनगरमधील मुजावर गल्लीत काही डुकरे मृत अवस्थेत आढळली.डुकरे पाळणाऱ्यांने त्या भागातील काही नागरिकांना डुकरे कोणी मारली असा जाब विचारून त्यांच्या दारात ती मृत डुकरे टाकली.संबंधित बाब भागातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला कळवली व डुकरांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली.तथापि ग्रामपंचायतीने याबाबत पोलिसात तक्रार करा असे सांगितले.नागरिकांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करा असे सांगितले.त्यामुळे नागरिक संतप्त झाले त्यांनी मृत दोन डुकरे ग्रामपंचायतींमधील सरपंच व उपसरपंच यांच्या केबिनमध्ये नेऊन टाकली.नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी बी.टी. कुंभार यांना याबाबत घेराव घातला.

ग्रामविकास अधिकारी बी.टी.कुंभार यांनी येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.डुकरे पाळणाऱ्यांवर ग्रामपंचायतमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी श्री. कुंभार यांनी नागरिकांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT