district bank election sakal
कोल्हापूर

अनिल पाटलांचे मनधरणीचे प्रयत्न; आवाडेंनी घेतली महाडिकांची भेट

या पार्श्‍वभूमीवर अनिल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

या पार्श्‍वभूमीवर अनिल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (District Bank election) निवडणुकीत पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे यांनी सत्तारूढ आघाडीतील उमेदवारीची स्वतःच घोषणा केल्यानंतर या गटातील संचालक अनिल पाटील (Anil Patil) यांनी लढण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्‍वभूमीवर अनिल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकाश आवाडे (Prakash aawade) यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक, (Mahadevrao Mahadik) पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष शंकर पाटील यांची भेट घेतली.

पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत अनिल पाटील यांनी सत्तारूढ गटाच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यात ते चार मतांनी विजयी झाले होते. यावेळीही ते सत्तारूढमधून या गटाचे प्रबळ दावेदार होते. (KDCC Election 2021) भाजपला सोबत घेऊन निवडणूक बिनिविरोध करण्याच्या प्रक्रियेतील तो महत्वाचा भाग होता. पण तत्पुर्वीच श्री. आवाडे यांनी सत्तारूढकडून याच गटातील उमेदवारी नेत्यांच्या मंजुरीचा हवाला देत जाहीर केली. त्यामुळे या गटातील विद्यमान संचालक श्री. पाटील यांच्यासह अर्जुन आबिटकर यांच्यात अस्वस्थता होती.

प्रकाश आवाडे यांच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी श्री. पाटील यांनी आपणही या गटातून रिंगणात उतरण्याचा निर्धार जाहीर केला. पाच वर्षापूर्वीच्या निकालाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी श्री. आवाडे यांनी श्री. पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत आज त्यांनी महादेवराव महाडीक, शंकर पाटील यांची राजाराम कारखान्यावर भेट घेतली. चर्चेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याचे समजते. माजी खासदार कल्‍लाप्पा आवाडे यांच्याशीही फोनवरून चर्चा घडवून आणली.

चंद्रकांत पाटील घेणार निर्णय

संचालक अनिल पाटील हे भाजपचे (BJP) संचालक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना सत्तारूढ गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. आता याचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील घेणार आहेत. एक-दोन दिवसांत ते कोल्हापुरात (Kolhapur Election) येणार असून त्यावेळी ही चर्चा होईल. आवाडे, कोरे हे सद्या भाजपसोबत असल्याने पाटील यांच्या निर्णयाला महत्त्व येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महायुती सरकारला झटका

Akola News : अकोट मध्ये ‘एमआयएम’ कडून स्वीकृत नगरसेवक म्हणून जितेन बरेठिया; भाजप नेत्याच्या पुत्राच्या सहभागाने पुन्हा राजकीय भूकंप!

Pune News : पुण्यात भाजप कार्यकर्त्यांना 'फ्लेक्सबाजी' करण्यास सक्त मनाई; शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पक्षाचे कडक आदेश!

Pune Crime : विश्रांतवाडी बस थांब्यावर पुणे पोलिसांची सापळा रचून कारवाई; कुख्यात गुंड अरबाज शेख अटक!

Supriya Sule : "पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असणार"- खासदार सुप्रिया सुळे!

SCROLL FOR NEXT