Aniruddha Ghatge  Esakal
कोल्हापूर

सैन्य भरतीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अनिरुद्धचा कळंबा तलावात मृत्यू

दादा बुडणार नाही परत येणार लहान भावाने फोडला टाहो

सकाळ डिजिटल टीम

कळंबा (कोल्हापूर): कोल्हापूर (Kolhapur) येथील कळंबा तलावामध्ये (Kalamba Lake) मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा आज बुडून मृत्यू झाला. अनिरुद्ध संभाजी घाटगे (वय २१) (Aniruddha Ghatge) सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ ( Shivaji Petha )असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर तात्काळ त्याच्या मित्रांनी ११२ नंबर वरून पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, विजय कळसकर हे पोलिस फौजफाटा घेऊन कळंबा तलावाच्या ठिकाणी दाखल झाले. तसेच त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व अग्निशामक दल यांना घटनास्थळी पाचारण केले.

दरम्यान, पोलिस दल आणि सैन्य भरतीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अनिरुद्धचा अचानक दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान करवीर पोलिस, अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कळंबा ग्रामपंचायत व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कर्मचारी व जीवरक्षक उदय निंबाळकर (Uday Nimbalkar) यांनी यांत्रिक बोटीद्वारे व कर्मचारी पाण्यात उतरून पाच तासाहून अधिक काळ तलावात शोध मोहीम राबविल्यानंतर सायंकाळी चार वाजता अनिरुद्धचा मृतदेह तलावाच्या पश्चिम भागामधील पात्रांमध्ये सापडला. अनिरुद्धच्या पश्चात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.

याबाबत घटनास्थळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनिरुद्ध घाटगे आज सकाळी साडेअकरा वाजता कळंबा तलाव येथे मित्रासोबत पोहायला केला होता. बारा वाजण्याच्या सुमारास अनिरुद्ध व त्याच्या चार मित्रांनी तलावात सूर मारला तसेच ते खोलगट असलेल्या मध्य भागापर्यंत पोहत गेले. त्यानंतर ते तलावाच्या काठी येण्यासाठी मागे फिरले. मात्र, पोहताना अचानक दम लागल्याने अनिरुद्ध पाण्यामध्ये बुडू लागला. जीव वाचवण्यासाठी त्याने पोहत पुढे गेलेल्या मित्रांना पाण्याबाहेर हात काढून इशारा केला. ही घटना लक्षात येताच मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केला. परंतु त्याला यश आले नाही.

तलावातील गाळ काढल्यामुळे पात्र खोलगट बनले आहे. तसेच त्या ठिकाणी पाणी साठा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनिरुद्धचा बुडून अंत झाला आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे घाटगे कुटुंबीयांनी कळंबा तलावाच्या काठी एकच आक्रोश केला. यावेळी शिवाजी पेठेतील नागरिकांनी तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती. अनिरुद्धचा मृतदेह सापडल्यानंतर शववाहिकेतून सीपीआर रुग्णालयामध्ये पुढील तपासासाठी नेण्यात आला.

माझा आधार गेला.. दादा माझा परत येणार

कळंबा तलावांमध्ये अनिरुद्ध बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे वडील संभाजी घाटगे व त्याचा लहान भाऊ हे नातेवाईका समवेत घटनास्थळी आले. त्यावेळी घाटगे यांनी अनिरुद्धच्या जुन्या आठवणींना उजाळा देत माझ्या जीवनाचा आधार गेला असा आक्रोश केला. तसेच त्याच्या लहान भावाने दादा बुडणार नाही परत येणार असे म्हणत धाय मुखाने रडू लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT