अनिता काळे sakal
कोल्हापूर

Navdurga: आतापर्यंत 65 हून अधिक वेळा केलं 'रक्तदान'

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर : महिला सलाईनची सुई, आयव्ही, इंजेक्शनला घाबरून रडारडी करतात, तर रक्तदान दूरच राहिले, असा अनेकांचा समज असतो. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे लक्ष्मीपुरीतील अनिता काळे यांनी दाखवून दिले. त्या स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढाकार घेत आहेत. केवळ रक्तदान शिबिरांत वर्षातून एकदा रक्तदान न करता गरज असलेल्यांसाठीही त्या धावून जातात, हे विशेष! ६१ वर्षे वय असलेल्या अनिता यांनी ६५ हून अधिक वेळा रक्तदान केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी वयाची साठी उलटल्यानंतर येणारे एकाकीपण सकारात्मक पद्धतीने घेऊन सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे.

पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये रक्तदानाचे प्रमाण कमी असते. मासिक पाळीच्या ४ दिवसांत अतिरिक्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यामुळे रक्तदान केल्यानंतर शरीरातील रक्त अजून कमी होईल, असा गैरसमजही अनेक स्त्रियांमध्ये असतो. हिमोग्लोबीनची पातळी योग्य असलेल्या महिला, मुलींना रक्तदान करता येते. रक्तदान केल्यामुळे कोणाचा जीव वाचत असेल तर ते करावे, असे प्रबोधनही त्या करतात. काळे वर्षातून कमीत कमी तीन वेळा रक्तदान करतात. सध्या वयामुळे त्यांना डॉक्टरांनी रक्तदान न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी रक्तदान चळवळीला बळ देण्याचे ठरवले.

काळे यांनी १९७५ मध्ये विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर टायपिंग, शॉर्टहँण्ड टायपिंग अशी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली. अनेक महिलांचे चुल आणि मूल असेच जग असणाऱ्या काळात त्या नोकरी करू लागल्या व सामाजिक कामांत सक्रिय राहिल्या. वारांगनाचे पुनर्वसन कसे करता येईल, यासाठी पाठपुरावा करत होत्या. त्यांच्या या कामाची दखल घेत राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळातर्फे २०११ मध्ये कामगार कल्याण मंडळाने गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविले. सध्या त्या न्यायालयात स्वयंसेवक आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थासोबत कार्यरत आहेत.

अनेक महिला भीती, अज्ञानातून रक्तदान करत नाहीत. मात्र, रक्तदानाचे बरेच फायदे आहेत. ते मी त्यांना समजावून सांगते. महिलांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्यासाठी प्रबोधन करते.

-अनिता काळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे सलग तिसऱ्यांदा विजयी

SCROLL FOR NEXT