Annual General Meeting of Gokul Dudh Sangh esakal
कोल्हापूर

Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'ची आजची सभा गाजण्याची शक्यता! पाहायला मिळणार राजकीय ईर्ष्या; सभेला मुश्रीफ, सतेज पाटलांची उपस्थिती

संघाची सभा आज दुपारी १ वाजता औद्योगिक वसाहतीतील पशुखाद्य कारखान्यात दुपारी १ वाजता होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

भेच्या व्यासपीठावरील मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांच्या उपस्थितीवरून सौ. महाडिक यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

कोल्हापूर : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) आज (ता. १५) होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा (Gokul Dudh Sangh) गाजण्याची शक्यता आहे.

संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न व त्याची सभेत मागितलेली उत्तरे यावरून राजकीय ईर्ष्या पाहायला मिळणार आहे. दरम्यान, संघाची सभा आज (ता. १५) दुपारी १ वाजता संघाच्या मालकीच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील पशुखाद्य कारखान्यात दुपारी १ वाजता होणार आहे.

या सभेला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार सतेज पाटील (Satej Patil) उपस्थित राहणार आहेत. सभेच्या पार्श्‍वभूमीवर महिन्याभरापासून संचालकांच्या वतीने तालुकानिहाय दूध संस्थांच्या बैठका घेऊन संघाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जात आहे, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून संचालिका सौ. महाडिक यांनीही प्रत्येक तालुक्यात जाऊन संघात सुरू असलेल्या गैरव्यवहाराबाबत आरोप केले आहेत.

त्यांच्या या आरोपाला संचालक मंडळाने प्रत्युत्तर दिले असले तरी त्याचे पडसाद आजच्या (ता. १५) सभेत उमटण्याची शक्यता आहे. सभेच्या व्यासपीठावरील मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांच्या उपस्थितीवरून सौ. महाडिक यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत.त्यांची उत्तरे सभेत मिळावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनीही सभेत विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली जातील, असे आश्‍वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT