answered from satej patil to chandrakant dada patil statement for yesterday in kolhapur 
कोल्हापूर

'कोल्हापुरातून लढण्याची चंद्रकांतदादांची वेळ चुकली'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्येच कोल्हापुरातून निवडणूक लढवायली हवी होती; मात्र ती वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे पराभूत झालो तर हिमालयात निघून जाईल, या पाटील वक्तव्यास फारसा अर्थ नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकारांना सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यातील पत्रकार परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. त्यासाठी कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा, तेथे पोटनिवडणूक लागल्यास मी निश्‍चितपणे निवडून येईल, मात्र पराभव झाल्यास हिमालयात निघून जाईल, असे वक्तव्य केले होते.

त्याबाबत विचारणा केली असता सतेज पाटील म्हणाले, ‘चंद्रकांत दादांनी २०१९ लाच निवडणूक लढवायला हवी होती, मात्र ते पुण्यातून लढले. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही त्यामुळे अन्य कोणी राजीनामा देण्याचा प्रश्‍नच नाही. निवडणूक लढविणे त्यातून जय किवा पराजय होणे आणि त्यातून हिमालयात निघून जाण्याचे वक्तव्य करणे यात काही अर्थ नाही.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT