Application filled by forged signature for selection of Usarpanch in kolhapur 
कोल्हापूर

कोण काय करेल नेम नाही ; चक्क उसरपंच निवडीसाठी बनावट सह्या करून भरला अर्ज 

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदवाड (कोल्हापूर) - शिरदवाड (ता. शिरोळ)च्या उपसरपंच निवडीच्या अर्जावर सदस्यांच्या बनावट सह्या करून नामनिर्देशन पत्र सादर केल्या प्रकरणी माजी उपसरपंच सयाजीराव जयसिंगराव पाटील व माणिक रामचंद्र मगदूम यांच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद सुजाता मारुती कोळी यांनी दिली आहे. दोघांना येथील प्रथमवर्ग न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सयाजीराव पाटील आणि माणिक मगदूम ग्रामपंचायत सदस्य आहेत. रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सुजाता मारुती कोळी यांनी सूचक म्हणून उपसरपंचपदाच्या उमेदवार नीता प्रमोद पाटील यांच्या नामनिर्देशनपत्रावर सही केलेली असताना माणिक मगदूम यांनी स्वतःच्या नामनिर्देशन पत्रावर  पाटील यांची खोटी बनावट सही करून उपसरपंचपदाच्या निवडीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले होते. वनिता विजय पोवार यांच्या उपसरपंचपदाच्या नामनिर्देशन पत्रावर अनिल दशरथ कुरणे यांनी सूचक म्हणून सही केली असताना सयाजीराव पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या नामनिर्देशन पत्रावर अनिल कुरणे यांची सूचक म्हणून खोटी बनावट सही करून नामनिर्देशन पत्र सादर केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT