Appointment of additional collector ashok Patil as Registrar of Sarathi 
कोल्हापूर

‘सारथी’च्या निबंधकपदी अपर जिल्हाधिकारी अशोक पाटील यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) निबंधकपदी कोल्हापूरचे सुपुत्र व अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) अशोक पाटील यांची नियुक्ती झाली. यापूर्वी श्री. पाटील ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.


श्री. पाटील मूळचे अंबप-पाडळी (ता. हातकणंगले) येथील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील विद्यानिकेतनमध्ये तर कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी कृषीची पदवी घेतली. ‘सारथी’चे निबंधक पद काही वर्षांपासून रिक्त होते. ‘सारथी’ संस्थेला आर्थिक सहाय्य मिळवण्याबरोबरच ही संस्था चालू राहावी यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यातून दोन दिवसांपूर्वीच या संस्थेसाठी ८० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.


दरम्यान, शासनाने १७ अपर जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती दिली असून त्यांचा समावेश अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) या संवर्गात केला आहे. यात तत्कालीन अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची बदली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहसचिव या पदावर तर दीपक नलवडे यांची बदली अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर झाली आहे. सांगली पालिकेचे तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची बदली विधान परिषदेचे उपसभापती यांचे सचिव, महाराष्ट्र सदनात कार्यरत व सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सौ. नंदिनी आवडे यांची पुणे येथे उपायुक्त (करमणूक शुल्क) या पदावर झाली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT