argument between congress activists and police in kolhapur 
कोल्हापूर

कृषी विधेयका विरोधात चक्का जाम ; पोलिस- कार्यकर्त्यांमध्ये झटापट  

सुनील पाटील

कोल्हापूर : केंद्र सरकारचे कृषी विधेयेक तात्काळ मागे घ्यावे, या मागणीसाठी कोल्हापूर-पुणे महामार्गावरती पंचगंगा पुलावर रास्ता रोको करुन 26 नोंव्हेंबरला होणाऱ्या भारत बंदमध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. काही वेळाने पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून सोडून दिले. यावेळी, मोदी सरकार मुर्दाबाद, शेतकरी विधेयक रद्द करा, मोदी सरकार भांडवशाही सरकार अशा जोरदार घोषणांनी परिसर दरणाणून सोडला. 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने पंचगंगा नदी -पुणे बेंगलोर महामार्गा, हळदी (ता. करवीर), मुधारतिट्टा (ता. कागल), सांगरूळ फाटा (ता. करवीर), मलकापूर (ता. शाहुवाडी) व बीडशेड (ता. करवीर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याला शेतकऱ्यांनीही उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. 

भाकपचे जिल्हा सहसचिव गिरीश फोंडे म्हणाले," संसदेत पास केलेली कृषी विधेयके ही शेतकरीविरोधी व जनता विरोधी देखील आहेत. बाजार समित्या बरखास्त करुन अदानी अंबानीला कमी किमतीत शेतीमाल ताब्यात घ्यायचं व शेतीचे खासगीकरण केले जात आहे. शेतीमाल हमीभावाचा कायदा करणे गरजेचे असताना सरकारने या कृषी विधेयकातील उलटी पावले टाकली आहेत. 
भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सकार शेतकरी विरूध्द धोरण अवलंबत आहे. बाजार समित्या बरखास्त करुन शेतकऱ्यांना देशाधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ताकद काय आहे, हे सरकारला माहिती आहे. यासाठी 26 नोव्हेंबरच्या भारत बंदमध्ये सर्वांनी उर्त्स्फुत सहभाग नोंदवला पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे म्हणाले," मोदी सरकार केवळ भांडवलदारांची हस्तक आहे. नव्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून वाढतील. स्वामीनाथन आयोगाची अमलबजावणी करण्याची ग्वाही भाजप सरकारने दिली होती. मात्र, त्यीां अमलबजावणी झालेली नाही. 

शेकापचे प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले," देशातल्या शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे तत्व भाजपचे आहे. जनता दलाचे रवी जाधव, समाजवादी पार्टीचे हसन देसाई, राष्ट्रवादी पक्षाचे व्यंकाप्पा भोसले, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. चक्का जाम होणार म्हणून सकाळपासूनच पंचगंगा पुल व तावडे हॉटेल परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. 
यावेळी संजय चौगुले, बाबुराव कदम, संपत पोवार, संभाजी जगदाळे, प्रशांत आंबी, महेश पांडव, अमोल होनकांबळे, उत्कर्ष पवार, दिलदार मुजावर, मधूकर माने, रियाज शेख, राजेंद्र पाटील, सुनंदा शिंदे, राजू देसाई, निखिल चव्हाण, हरीश कांबळे, अण्णा मगदूम,प्रदीप फोंडे उपस्थित होते. 

पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट : 
पंचगंगा पुलाजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनोगत झाल्यानंतर तात्काळ तिथे रस्तावर ठाण मांडली. यामुळे पोलीसांनी कार्यकर्त्यांना उचलून गाडीत घालावे लागले. यावेळी, गिरीश फोंडे, रवि जाधव, सतीश कांबळे, टी. एस. पाटील यांना पोलिसांनी उचलून पोलीस गाडीत ढकलले. प्रचंड घोषणाबाजीमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधले. 

  लक्षवेधी घोषणा : 
-शेती बचाव देश बचाव, नवीन कृषी विधेयके हाणून पाडा 
- शेतकरी विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो 
= शेतीचे खासगीकरण होऊ देणार नाही 
-सहकार बचाव देश बचाव 
- शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो 

 आंदोनलनात सहभागी संघटना 
स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य किसान सभा, शेतकरी कामगार पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, जनता दल सक्यलर आणि आम आदमी पार्टी 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT