कोल्हापूर : साडी, बांगड्या, कपडे, घागरा अशा जुन्या कोणत्याही कापडावर वळणदार नक्षीकाम करून नावीन्यपूर्ण वेशभूषा करण्याची सुबक कला तेजश्री भस्मे यांनी आत्मसात केली आहे. जुने कपडे टाकून देण्याचे टाळून यातून आकर्षक, लक्षवेधी बनविलेल्या वेशभूषा युवती व महिलांचे व्यक्तिमत्त्व खुलवत आहेत. लॉकडाउनच्या काळात हा जोपासलेला छंद तेजश्री यांनी अर्थार्जनाचे साधन बनवत त्याला व्यावसायिक लूक दिला आहे.
नागाळा पार्क या परिसरातील तेजश्री यांची कपडे कलाकृती अनेकींना जुन्याचा विनियोग अर्थार्जनासाठी पर्याय म्हणून उपयुक्त पाऊलवाट ठरत आहे. तेजश्री यांना लहानपणापासूनच विविध कपड्यांच्या डिझायनिंगबाबत आवड होती. यातूनच त्यांनी सायबर महाविद्यालयातून फॅशन डिझायनिंगचे पदवीचे शिक्षण घेतले. पुढे पदव्युत्तर शिक्षणही फॅशन डिझायनिंगमधूनच पूर्ण केले. वेशभूषेतील विविध प्रयोग त्या करत राहिल्या. इमबिश्ड स्टिचेस या नावाने इन्स्टाग्राम पेजही सुरू केले. यावरून विविध कलात्मक वेशभूषांचे फोटोज् शेअर करू लागल्या. यातूनच त्यांच्या
वेशभूषांना मागणी वाढत गेली. लग्न समारंभ, वर्षभरातील सण, हळद, वाढदिवस आदी समारंभांसाठी हटके लूक हवा असेल तर अनेक तरुणी, महिला भस्मे यांच्याशी संपर्क साधतात. त्यांना हवी तशी डिझाईन्स करून घेतात. हव्या त्या स्टाईलमध्ये वेशभूषा तयार केल्याने कस्टमाईज कपड्यांसाठी त्या ओळखल्या जात आहेत. हस्तकला, जरदोशी वर्क, आदिवासी कला आदींचा वापर करत त्यांनी फॅशन विश्वात आपले नाव ठळक केले आहे. आपल्या कलेतून उत्पन्न मिळवताना काही महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
स्वतः बनविलेल्या विविध कलात्मक वेशभूषा त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केल्या. सुरवातीला मिळणाऱ्या लाईक्समधून त्यांचे मनोधैर्य वाढले. पुढे विविध वेशभूषा शेअर केल्यानंतर ऑर्डर्सही मिळू लागल्या. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे अर्थार्जन सोपे झाल्याचे त्या सांगतात.
महिलांना रोज नवनवीन स्टाईलच्या वेशभूषांची आवड असते. ही आवड ओळखून मी विविध प्रकारच्या कला एकत्र करून वेशभूषा करण्याचा प्रयत्न केला. तो महिला, युवतींना आवडला. सध्या हस्तकला, जरदोशी वर्क तसेच आदिवासी कलेचा वापर करून मी विविध वेशभूषा साकारते.
- तेजश्री भस्मे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.