The Art Teacher Carved 2 To 18 Cm Sculptures In Hampi Stone Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कला शिक्षकाने हंपी दगडामध्ये कोरली 2 ते 18 सेमीची शिल्पे, वाचा नेसरीच्या कलासक्त शिक्षकाची कहाणी

दिनकर पाटील

नेसरी : मनाने एकदा ठरवलं आणि त्यानुसार प्रयत्न केले तर अनेक आवघड गोष्टी शक्‍य होवून जातात. असेच कार्य गडहिंग्लज तालुक्‍यातील नेसरी येथील एस. एस. हायस्कूलमधील कला शिक्षक सुनिल सुतार यांनी करून दाखविले आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन काळात अख्ख जग थांबल असताना वेळेचा सदोपयोग करून हंपी दगडामध्ये 2 ते 18 सेंटीमिटरपर्यंत नाजूक अशी लक्षवेधी सुतार, लोहार कामात असलेली विविध साधने कोरली आहेत. 


कलेच्या व्यासंगाने झपाटलेल्या सुनिल यांनी कलेच्या जोरावर ओबड-धोबड दगडामध्ये जीव ओतून सुतार यांनी लक्षवेधी सुंदर दगडी शिल्पे कोरली आहेत. यामध्ये करवत, पातळी, चिरणे, डिशमिस, रंधा, कोनाळी, तासणी, कुऱ्हाड, खतावणी, गिरमिट या सुतार कामातील साधनांसह, तर ऐरण, घन, हातोडा, छन्नी, सांडशी या लोहार कामात असणाऱ्या साधनांचा त्यात समावेश आहे. सुतार यांनी कला शिक्षक म्हणून काम करत असताना चित्रकलेच्या माध्यमातून तैलचित्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शिवराजाभिषेक, निसर्ग चित्रे रेखाटली आहेत.

शिल्प कलेच्या माध्यमातून शिवाजी महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रपुरूषांच्या विषयावर उठावदार शिल्पे कोरली आहेत. शाळेत जयंती, पुण्यतिथी व सेवानिवृत्त कर्मचारी, सांस्कृतिक कार्यक्रमातून रंगीत खडूंच्या माध्यमातून व्यक्‍तीचित्रे रेखाटण्याचे काम ते करतात. यापूर्वी सुतार यांनी नेसरी हरिजन वाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तुकाराम कोलेकर महाविद्यालय आवारात क्रांतीस्थळ आदी सार्वजनिक ठिकाणी लक्षवेधी उठावदार शिल्पांसह पेन्सिलवर वर्ल्डकप प्रतिकृती कोरली आहे.

कल्पकतेच्या अविष्कारातून साबण, खडू, मेणबत्ती यांचा वापर करून साखळी, प्राणी, कोल्हापूरी चप्पला, देवदेवतांच्या प्रतिमा करून आपली कसब दाखवली आहे. सुतार यांना जिल्हा परिषद सदस्य तथा संस्थाध्यक्ष ऍड हेमंत कोलेकर यांचे सतत प्रोत्साहन मिळत आहे. त्यांनी कोरोना काळात कोरोना प्रबोधनात्मक गीत तयार करून त्याचे गायन केले आहे. 

आठ दिवसाच्या परिश्रमानंतर शिल्पे
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात कडकडीत लॉकडाउन होता. तेव्हा घरातून बाहेर पडणे जिकीरीचे होते. परंतु, अंगातील कलागुण गप्प बसू देत नव्हते. उपलब्ध हंपी दगडामध्ये सुतार, लोहार कामासाठी लागणारी साधने बनविण्याचा निर्धार केला. आठ दिवसाच्या परिश्रमानंतर दगडामध्ये साधन शिल्पे तयार झाली. 
- सुनिल सुतार, एस. एस. हायस्कूल, नेसरी

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SAW Final: शफाली वर्मा-दीप्ती शर्माची अर्धशतकं, ऋचाची वादळी खेळी; World Cup जिंकण्यासाठी भारताचे द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य

वाशिमध्ये खळबळ! २ किलो अंमली पदार्थ अन् लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Crime: 'तुझ्यामुळे माझी बहीण गेली...'! मामाचे शब्द ऐकताच भाचा संतापला; रागात खेळच संपवला, वादाचं कारण काय?

Lonar Lake : अहो आर्श्चयम! लोणार सरोवरात आढळले चक्क मासे, दुर्मिळ जैवविविधता धोक्यात...

Pune: चेंजिंग रूमपासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंत सुविधा... पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT