arun lad visit to mantri hasan mushrif in kagal request and blessing from mushrif in kolhapur 
कोल्हापूर

'अरुण लाड यांच्या विजयात कोल्हापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल'

नरेंद्र बोते

कागल : क्रांतीसिंह नाना पाटलांच्या ब्रिटिशांविरुद्धच्या पत्री सरकारमध्ये क्रांतीअग्रणी जी. डी. बापू - लाड यांचे योगदान मोठे होते. स्वातंत्र्य चळवळीचा महान वारसा असलेल्या पुणे पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाने क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतीअग्रणी जी. डी. बापू - लाड यांचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

लाड यांनी कागलमध्ये येऊन मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत अरुण लाड यांची अपार मेहनत फळाला आणूया. गेल्या तिन्ही निवडणुकांत त्यांनी अपार कष्ट, मेहनत घेतली. परंतु यश आले नाही. यावेळी सर्वच कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करुन या मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकावतील. अरुण लाड यांच्या विजयात कोल्हापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल. ए. वाय. पाटील आणि भैया माने यांची नावे राज्यपातळीवर असतील. 

ते पुढे म्हणाले, या मतदार संघातून अर्ज भरलेले भैया माने यांनी पदवीधरच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये एक उत्कृष्ट संघटक म्हणून काम केले. ते हाडाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे जिद्दी सैनिक आहेत. त्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. शरद पवार यांनीही त्यांना तसा निरोप पाठविलेला आहे. त्यांनी माघार घ्यावी, अशी विनंती मुश्रीफ यांनी केली. राष्ट्रवादी पक्षासाठी ज्यांना थांबावं लागलं अशी, ए. वाय. पाटील आणि प्रताप उर्फ भैय्या माने यांची नावे लवकरच राज्य पातळीवर दिसतील, असेही ते म्हणाले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Farmer : इमानदार श्वानांची धाडसी कहाणी! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे प्राण वाचले, कुत्र्यांनी हल्ला करताच बिबट्याने...

U19 IND vs PAK: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात रोखण्यात पाकड्यांना यश; पण आयुषच्या प्रहाराने झाले बेजार; चौकार- षटकारांची बरसात

Latest Marathi News Live Update: आपण सारे महाराष्ट्राची विचार करणारे लोक- देवेंद्र फडणवीस

Hacking Tips : तुमच्या मोबाईल स्क्रीनवर 3 रंगीत ठिपके बघितलेत का? फोन हॅक झालाय का पाहायचं असेल तर 'हे' एकदा चेक कराच

मनपा निवडणुकीबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर! राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात? आचारसंहिता होणार लागू

SCROLL FOR NEXT