Arya Chavan and Rituja Kamble from Kolhapur reached Mumbai from Ukraine
Arya Chavan and Rituja Kamble from Kolhapur reached Mumbai from Ukraine sakal
कोल्हापूर

Russia Ukraine War : कोल्हापूरच्या त्या दोघी युक्रेनमधून मुंबईत पोहोचल्या

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापुरातील विद्यार्थिनी आर्या चव्हाण आणि ऋतुजा कांबळे आज रात्री नऊच्या सुमारास मुंबईत सुखरूप पोहचल्या. ऋतुजाची आत्या मुंबईत असल्यामुळे दोघीही आज तेथेच राहणार आहेत. दोघींचे पालक उद्या (ता. २७) त्यांना आणण्यासाठी मुंबईला जाणार आहेत. दोघी रविवारी रात्री किंवा सोमवारी कोल्हापुरात पोचणार आहेत.

दरम्यान, गंगावेश येथील आर्या चव्हाण आणि प्राजक्ता पाटील, फुलेवाडी रिंगरोडवरील जिल्हा परिषद कॉलनीतील ऋतुजा कांबळे या तिघी सुखरूप आहेत. त्या उद्या कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. साहिल अनंत म्हामणकर आणि प्रथमेश महेश घोडके या दोघांचीही नावे पुढे आली आहेत. यातील घोडके रशियात असून तेथे सुरक्षित असल्याचे त्याच्या काकांनी तसेच आणि जिल्हाधिकारी कार्यालयातूनही सांगण्यात आले. साहिल हा युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहे.

आर्याच्या आईने सांगितले, की त्या दोघीही सकाळी रोमानियातून भारताकडे निघाल्या आहेत. दुपारी साडेबारा वाजता त्यांचा शेवटचा कॉल झाला आहे. त्यानंतर त्या विमानातून प्रवास करीत असल्यामुळे संपर्क झाला नाही. रात्री नऊच्या सुमारास त्यांचे विमान मुंबईत आले. रोमेनियात त्यांची चांगली व्यवस्था झाली. त्या केवळ प्रवासामुळे दमल्या असल्यामुळे आज मुंबईतच राहणार आहेत. तिच्या सोबत मैत्रीण ऋतुजाही असल्यामुळे आमची काळजी मिटली आहे. दोघीही मुंबईतून कोल्हापुरात आल्यावर त्यांचे अनुभव सर्वांशी मनमोकळेपणाने सांगणार आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT