Ashram of Shabari in Belgaum relation with Ramayana series 
कोल्हापूर

बेळगावात चर्चा शबरीच्या आश्रमाची ; रामायण मालिकेशी काय आहे संबंध ? 

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने जुन्या गाजलेल्या मालिकांचे पुनर्प्रसारण सुरु केले आहे. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र, सध्या बेळगाव भागात चर्चा आहे ती रामाची भूमिका केलेल्या अरुण गोविल यांनी सांगितलेल्या शबरीच्या आश्रमाबाबतची. गोविल यांनी बेळगाव परिसरात शबरीचा आश्रम होता. या भागातच राम व लक्ष्मण यांनी कबंध राक्षसाचा वध केला होता, अशी माहिती देणारा व्हिडीओ जारी केला असून हा व्हिडीओ सध्या बेळगाव परिसरात प्रचंड हिट होत आहे. 

रामायण मालिका पुन्हा दाखविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मालिकेला पुन्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. याबाबत व्हिडीओवरुन प्रेक्षकांशी संवाद साधताना, रामायण काळात उल्लेख असणाऱ्या काही स्थळांबाबत गोविल यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार बेळगाव येथे शबरीचा आश्रम होता. तसेच कबंध राक्षसाचा येथेच वध करण्यात आला होता. त्यानंतर राम व लक्ष्मण सुग्रीवचा शोध घेण्यासाठी पुढे निघून गेले, अशी माहिती दिली आहे. पौराणिक काळातील माहितीनुसार रामदुर्ग तालुक्‍यातील सुरेबानजवळ शबरी आश्रम होता. सुरेबानला पूर्वी शबरीवन म्हणून ओळखले जात होते. या गावाजवळ शबरीचे मंदिर असून यावरुन शबरी माता याठिकाणी भगवान रामाची वाट पाहत असल्याचे पुरावे मिळतात. तर रामदुर्ग तालुक्‍यातील करडीगुड गावाजवळ हे गाव आहे. येथे कबंध आश्रम होता. या ठिकाणी कबंध राक्षसाचा वध करण्यात आला. त्यांनतर तो राक्षस शापमुक्‍त झाला होता, अशी माहिती मिळते. यावरुन सीतेचा शोध घेत असताना राम व लक्ष्मण यांचा बेळगाव जिल्ह्यात वास असल्याचे प्रमाण मिळाले आहे. अरुण गोविल यांनी माहिती दिलेला व्हिडीओ जारी झाल्यानंतर सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ सर्वत्र फिरविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT