Asian Paints‌ Company advertising case Protests at Shivaji Maharaj Chowk On behalf of Shiv Sena 
कोल्हापूर

एशियन पेंटने माफी मागावी ; अन्यथा कोल्हापूरी हिसका दाखवू ; शिवसेनेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : स्वत:च्या जाहिरातीसाठी कोल्हापूरची बदनामी करणाऱ्या एशियन पेंटस्‌ कंपनीने जाहीर माफी मागावी, अन्यथा हिसका दाखवण्याचा इशारा देत शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. दरम्यान, कंपनीने यूट्यूबवरील ती अवमान करणारी जाहिरात रद्द केली.
शाहूंच्या समृद्ध कोल्हापूरची तुलना सिंगापूरशी करून दक्षिण काशी कोल्हापूरचा अवमान करणारी जाहिरात प्रसिद्ध केली. ती बंद करून कंपनीने कोल्हापूरवासीयांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.


संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.  धनाजी दळवी, रमेश खाडे, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, अमित चव्हाण, अजित गायकवाड, विशाल देवकुळे, राहुल चव्हाण, राजू काझी, सुरेश कदम, सनी अतिग्रे, अश्विन शेळके, गजानन भुर्के, मंदार तपकिरे, सचिन भोळे, नीलेश हंकारे, पियूष चव्हाण उपस्थित होते.


एशियन पेंट्‌सला आम आदमी पार्टीचे निमंत्रण
एशियन पेंट्‌सने केलेल्या जाहिरातीत कोल्हापूरचा उल्लेख उपोरोधिक करून कोल्हापूरची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला आहे. आम आदमी पार्टीने एशियन पेंट्‌स कंपनीच्या मालकांना पत्र लिहून कोल्हापूर पाहण्यास येण्याचे निमंत्रण दिले. जाहिरात बनवणाऱ्या टीमला कोल्हापूरची सैर करण्यासाठी ‘आप’तर्फे तिकिटांची सोय करणार असल्याचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले. दरम्यान पुढचा भाग म्हणून त्यांनी कोल्हापुरातील चित्रनगरीत चित्रीकरण करतील, असा विश्वास आहे. त्यासाठी लागणारे सर्व कलाकार, तांत्रिक सहायक, आयटीमधील इंजिनियर आमच्याकडे आहेत, असे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे निषेध
एशियन पेंटस्‌ कंपनीने जाहिरातीमधून शाहूनगरीचा अवमान केला. आमदार ऋतुराज पाटील यांनी निषेध नोंदवत कंपनीला जाहिरात मागे घेऊन माफी मागण्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर युवक काँग्रेस आणि एनएसयुआयतर्फे छत्रपती शिवाजी चौकात कंपनीविरोधात निदर्शने केली. रंगाचे डबे गटारीत ओतून कंपनी जाहिरात मागे घेऊन माफी मागत नाही. तोपर्यंत एकही डबा विकू देणार नाही, असे युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक थोरात यांनी सांगितले. उदय पोवार, विनायक पाटील, पार्थ मुंडे, अक्षय शेळके, वैभव देसाई, सत्यजित शेजवळ, चंद्रकांत लोंढे, सागर चौगुले, उमेश पाडळकर, रोहित गाडीवडर, आनंदा करपे उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

Video Viral: बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरने केली बेदम मारहाण; घटनेचं कारण आलं समोर

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी घरबसल्या करता येणार अर्ज! ‘या’ पोर्टलवर अर्ज केल्यावर 2 दिवसांत बॅंकांकडून मिळेल पीककर्ज, सोलापुरात शासनाचा पायलट प्रोजेक्ट

SCROLL FOR NEXT