Assam Rifles recruitment in Fraud of Rs 6 lakh Young 
कोल्हापूर

आसाम रायफलमध्ये भरतीचे आमिष; तरुणाची सहा लाखांची फसवणूक

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर: आसाम रायफलमध्ये भरतीचे आमिष दाखविणारी टोळी कोल्हापुरात कार्यरत आहे. याबाबतची मालिका ‘सकाळ’ने एप्रिल २०१९ मध्ये प्रसिद्ध केली होती. यातून शाहूवाडी तालुक्‍यात गुन्हाही दाखल झाला. करवीर तालुक्‍यातही अशाच पद्धतीने एका तरुणाची सहा लाखांची फसवणूक झाल्याचे आज उघडकीस आले आहे. हे रॅकेट मुळापासून शोधून कारवाई झाल्यास अनेक तरुणांची फसवणूक टाळता येणे शक्‍य आहे. 


करवीर तालुक्‍यातील एका तरुणाची आसाम रायफलमध्ये भरती करण्याच्या आमिषाने सहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबतची माहिती खुद्द पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घेतली. तेव्हा लग्नासाठी मुलींकडून नोकरीची मागणी होत असल्यामुळे शेती विकून सहा लाख रुपये दिल्याचे त्यांना सांगण्यात आले. सैन्यात भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुण इच्छुक असतात, लग्नासाठी नोकरी पाहिजे, म्हणून भामट्यांच्या आमिषाला ते बळी पडत असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. 


दरम्यान, गतवर्षीच आसाम रायफलमध्ये भरती करतो म्हणून शाहूवाडी, पन्हाळा तालुक्‍यातील काही तरुणांची फसवणूक करण्यात आली. याबाबत ‘सकाळ’ने मालिका प्रसिद्ध केल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला होता. मात्र अनेक तरुणांची फसवणूक होऊनही पैसे परत मिळतील, या आशाने त्यांनी फिर्याद दिलेली नव्हती. करवीर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातसुद्धा ही फसवणूक २०१४ पासून सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे हे रॅकेट नेमके कोठे पर्यंत कार्यरत आहे. इथंपर्यंत पोलिसांचा तपास पोचला तर नक्कीच यातून आसामपर्यंतची साखळी पुढे येण्याची शक्‍यता नाकारता 
येत नाही. 

तक्रारीस टाळाटाळ
आसाम रायफलमध्ये भरती करतो म्हणून फसलेल्या शाहूवाडी तालुक्‍यातील काही तरुण आजही एजंटाकडे जाऊन त्यांच्याकडे दिलेल्या पैशांची वसुली करीत आहेत. पोलिसांत तक्रार दिल्यास आपण अडचणी येईल, अशी भीती त्यांना आहे. त्यामुळेच ते पोलिसांकडे फिर्याद देण्यास येत नसल्याचे शाहूवाडी तालुक्‍यातून सांगण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT