Association Of Engineers To Help Those In Need Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

मातीशी नाळ ठेवत होतकरूंसाठी धडपडताहेत अभियंते; दरवर्षी वर्गणीतून विद्यार्थी, खेळाडूंसह अडलेल्यांना मदत

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : ते सर्वजण पॉलिटेक्‍निकचे वर्गमित्र. सर्वांचीच बेताची आर्थिक परिस्थिती. परिस्थितीचे चटके सोसतच चिकाटीने शिक्षण पूर्ण केले. गुणवत्तेच्या जोरावर पदवी मिळवत शासकीय, नामवंत उद्योग समूहात मोठ्या पदावर नोकरी मिळवली. गलेलठ्ठ पगार मिळाल्यावरही त्यांनी आपल्या मातीशी नाळ तुटू दिली नाही. खासकरून ग्रामीण भागातील गुणवत्तेला आर्थिक पाठबळाअभावी होणाऱ्या अडचणींची जाण ठेवत मदतीचा निर्णय घेतला. यासाठी कोणाकडे हात न पसरता दरवर्षी स्वतः वर्गणीतून शालेय, महाविद्यालयीन होतकरू विद्यार्थ्यांसह अडलेल्यांना हेरून मदतीचा हात देत आहेत. ही कहाणी आहे टॅलेंट कन्सोल ग्लोबल फौंडेशनच्या (टीसीजी) छताखाली काम करणाऱ्या अभियंत्याची. 

ग्रामीण भागात राहूनही दहावीत मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या मार्कांच्या आधारे अभियंता होण्याचे स्वप्न बाळगले. गारगोटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल ऍन्ड रुरल इंजिनिअरिंग (आयसीआरई) मध्ये त्यांच्या गुणवत्तेला पैलू पडले. त्यावेळी विणलेला मैत्रीचा धागा शिक्षण पूर्ण केल्यानंतरही कायम राहिला. देशासह परदेशात उच्च पदावर नोकरीला लागले. यात कतार, फिनलॅंड या देशासह राज्यात महावितरण, महापारेषण, बांधकाम यासह मर्सिडीझ बेंन्झ, मित्यूभिशी, कोणक्रेन अशा मात्तब्बर उद्योगसमूहांचा समावेश आहे. 

सर्व सुखे पायाशी लोळण घेत असतानाच आपल्याला आलेली संकटे इतरांना झेलावी लागू नयेत, यासाठी एकत्र येऊन मदतीचा निर्णय घेतला. गुणवत्तेला बळ मिळावे, या प्रामाणिक उद्देशाने "टीसीजी'चा श्रीगणेशा केला. प्रत्येकाने दरवर्षी वर्गणी देऊन निधी उभा केला. या निधीतूनच मदत केली जाते. 

गतवर्षी गडहिंग्लज, चंडगड तालुक्‍यातील 70 हून अधिक महापूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना एक लाखाचे शैक्षणिक साहित्य पुरविले. गडहिंग्लज युनायटेडच्या मदतीने बेबी लिगच्या नवोदित 600 फुटबॉलपटूंना दोन वर्षांपासून प्रोत्साहन देत आहे. गतवर्षी चंदगड तालुक्‍यातील अनाथ भावंडांना घरासाठी मदत केली. चाळीस जणांच्या या टीसीजी फाउंडेशनचे गंगाराम नाईक, प्रा. प्रमोद इंचनाळकर, संजय पाटील, राजू भोपळे, जिनगोंडा पाटील, दयानंद चौगुले, आरती जांबोटकर, शुभांगी रानमाळे, दीपाली देशमुख, वैभव गवस, ज्योतिबा जाधव विश्‍वस्त म्हणून काम पाहतात. 

मदतीला आले फळ 
दहावीला चांगले गुण असूनही केवळ आर्थिक पाठबळाअभावी अनेकजण शिक्षण अर्धवट सोडतात. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन टीसीजीने गेल्या चार वर्षांत गारगोटी, मुदाळ, गडहिंग्लज, सावंतवाडी, सोलापूर येथील अर्धा डझन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. यातील सावंतवाडीच्या विद्यार्थिनींना कॅम्पस इंटरव्ह्यूमधून अभियंता म्हणून नोकरी लागली. तर गारगोटीच्या तिघांना मेरिटवर पुण्यातील नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश मिळाला आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT