The atmosphere in the market committee is tight due to the inquiry, the director is heartbroken, the leaders are silent 
कोल्हापूर

चौकशीमुळे बाजार समितीतील वातावरण टाईट, संचालक हवालदिल, नेत्यांचे मौन

शिवाजी यादव

कोल्हापूर ः शेती उत्पन्न बाजार समितीत नियमबाह्य पद्धतीने 29 जणांच्या नोकरभरती व नियमबाह्य पद्धतीने जागा हस्तांतर व्यवहार प्रकरणी जिल्हा निबंधकांकडून कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. यात संचालक मंडळाचे छुपे बेकायदेशीर व्यवहार चौकशी समितीपर्यंत पोहचविण्यासाठी एक वर्ग प्रयत्नशील आहे. तर संचालकाच्या पातळीवर नेत्यांच्या भेटीगाठी जोरात सुरू आहेत. मात्र, बाजार समितीवर लवकर प्रशासक यावा, अशी उघड मागणी बाजार समिती वर्तुळात चर्चेत आली आहे. 
बाजार समितीत 24 जागा भरण्यासाठी चार हजार अर्ज आले होते, ते बाजूला ठेवून संचालक मंडळाने आपल्या जवळच्या नात्यातील मुलांना कायमस्वरूपी नोकरी दिली. त्यासाठी नियम, अटी धाब्यावर बसवल्याच्या तक्रारी जिल्हा निबंधकांकडे झाल्या. मार्केट यार्डातील एक भूखंड नियमबाह्य पद्धतीने 40 गाळे बांधण्यासाठी वापरण्यात येणार होता. तर 17000 चौरस फूट भूखंड 2 लाख 13 हजार इतक्‍या अल्प किमतीत भाडेतत्त्वावर दिला. यासह 12 प्रकारच्या तक्रारी आहेत. या तक्रारी तपशीलवार चौकशी समितीपर्यंत पोहचविण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत. 
शासकीय चौकशी सुरू झाल्यानंतर काही संचालकांच्या अंर्तगत धुसफूस सुरू झाली आहे. सहा संचालक अजूनही भरतीसह सर्व व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी शक्कल लढवत आहेत. तर एक कामगार नेता व दोन माजी सभापतींनी मौन धारण केले आहे; पण चौकशीच्या संकटातून वाचण्यासाठी प्रयत्न करण्यावर सर्वांचे एकमत आहे. यातील काहींनी कागल, राधानगरी, भुदरगड, वारणानगर येथे माजी मंत्री, मंत्री, माजी आमदार, जिल्हा नेत्यांना संपर्क करून पुढील धोके टाळण्यासाठी विनंती केली. मात्र, बहुतेक नेत्यांनी संचालक मंडळालाच धारेवर धरल्याच्या चर्चा मार्केट यार्डातील सुरक्षा रक्षकापासून ते घरी बसलेल्या माजी संचालकांपर्यंत बहुतेकांच्या सुरू आहेत. 

त्यांची मागणी फेटाळली 
अशात 29 कर्मचाऱ्यांनी आमची सेवा एवढी झाली असून नोकरीतून आम्हाला काढू नये, अशा आशयाचा मागणी अर्ज कामगार न्यायालयात दाखल केला होता. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर तो अर्ज कामगार न्यायालयात फेटाळण्यात आला. 

प्रशासक येणार का? 
बाजार समितीच्या कारभाराची चौकशी सुरू आहे. नव्या तक्रारी जिल्हा निबंधकांकडे जात आहेत. अशात संचालक मंडळांची मुदत लवकरच संपत आहे. त्यामुळे बाजार समितीवर लवकरच प्रशासक येण्याची शक्‍यता बाजार समिती वर्तुळात वर्तविली जात आहे. 

-संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadodara-Mumbai: वडोदरा–मुंबई द्रुतगती महामार्गाला बंदराशी थेट जोड! १४ किमीचा नवीन रस्ता बांधणार; पण कुठे? पाहा मार्ग

मोठा निर्णय! वाहनांमध्ये GPS सक्तीचे; मार्ग बदलला तर कारवाई होणार, राज्य सरकारचा मोठी घोषणा

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; सुप्रीम कोर्टाकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

Chh. Sambhaji Nagar News : कन्नड तालुक्यात ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण; शासकीय मका खरेदीचा मुहूर्त मात्र रखडलेला!

Raigad News : पाली एसटी बसस्थानकाच्या दुरवस्थेवर वर्सोवाचे आमदार हरून खान आक्रमक; हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित!

SCROLL FOR NEXT