National-Pension-System Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : ‘ॲट्रॉसिटी’तील पीडितांना तत्काळ पेन्शन

जिल्हाधिकारी राहुल रेखावार; जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या खून आणि मृत्यू प्रकरणांमध्ये १९९५ पासून प्रलंबित पीडित वारसांना तात्काळ पेन्शन लागू करण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

श्री. रेखावार म्हणाले, ‘‘अनुसूचित जाती-जमातीमधील पीडित मुलींना महिला व बालविकास विभागाने समुपदेशन व कायद्याची माहिती द्यावी. पीडित मुलींचा वैद्यकीय तपासणी अहवाल ४८ तासांत द्यावा. प्रलंबित प्रकरणांचा पोलिसांनी तपास करून योग्य ती कार्यवाही करावी.’’(meeting of District Vigilance and Monitoring Committee)

दरम्यान अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिस तपासावरील प्रलंबित प्रकरणे, कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य अदा केलेली व प्रलंबित प्रकरणे, न्यायालयात दाखल प्रकरणांचा आढावा रेखावार यांनी घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रलंबित प्रकरणे व तपास सुरू असणाऱ्या प्रकरणांची माहिती दिली.

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे म्हणाले, ‘‘ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत २०११ पासून ते आजपर्यंत १५ प्रकरणी पेन्शन देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच पेन्शन अदा केली जाईल. १९९५ ते २०११ च्या प्रकरणांची शहानिशा करण्याची कार्यवाही पोलिस व समाज कल्याण विभागातर्फे सुरू आहे. जानेवारी २०२१ ते आजअखेर कागदपत्रांअभावी २० प्रकरणे तर पोलिस तपासावरील १२ प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे.’’(Proceedings for payment of pension in 15 cases from 2011 to date under atrocity Act are in final stage)

सोमवारी भेटणार

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे विभाग, महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा तसेच शासनाचे इतर सर्व विभाग, यांच्याकडील विकासकामाचे प्रस्ताव किंवा अन्य प्रशासकीय कारणास्तव, वनविभागाचा अडथळा असल्याने काम प्रलंबित असेल असा विषयाशी संबंधित कागदपत्रे घेऊन सोमवारी (ता. २७) सकाळी ११ जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.(Collector Rahul Rekhawar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT