attack on one in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

थरारक; खंडणीची मागणी करत रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पाठलाग करून कोयत्याने केला हल्ला ; पण...

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : वीस हजार रूपयाच्या खंडणीची मागणी करीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी थरारक पाठलाग करून एकावर कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच घरात जाऊन सुरक्षित आसरा घेतल्याने पुढील अनर्थ टळला. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आसरानगर परिसरात ही घटना घडली. या घटनेत संशयीतांनी बुलेटची मोडतोड केली असून एका घरावर हल्ला केला. 

या प्रकरणी अनिल चंद्रकांत काजवे (वय 31) याने गावभाग पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी महादेव नंदनवाडे, आसिफ राजन्नावर, अभिजीत बाबर, राहुल केसरे या सराईत गुन्हेगारांसह अन्य अनोळखी चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. यातील मुख्य संशयीत नंदनवाडे याला अटक केली असून रात्री उशिरापर्यंत उर्वरीत संशयीतांची पोलिसांनी धरपकड सुरू केली होती.


याबाबत अधिक माहिती अशी, काजवे हे आपली बुलेट मथुरानगर येथे लावून मालक संदीप वाकरे यांच्या गाडीवरून सोलगे मळा येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी पावणेदोन वाजता परत आल्यानंतर त्यांना बुलेट खाली पडलेली दिसली. यामध्ये बुलेटची मोडतोड करण्यात आली होती. याबाबत तक्रार करण्यास काजवे हे मालक वाकरे यांच्या गाडीवरून पोलिस स्टेशनला जाण्यासाठी आपल्या घरी आले. तोपर्यंत त्यांच्या मागेच संशयीत मोटारसायकलवरून दहशत माजवित आले. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरी जावून दारे बंद करून घेतली. 

नंदनवाडे याच्या हातात कोयता तर अन्य संशयीताच्या हातात मागाचे लाकडी मारे होते. नंदनवाडे याने पुन्हा काजवे यांना खंडणी न दिल्याबद्दल बुलेट फोडल्याचे सांगत जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत वार करण्याचा प्रयत्न केला. तो वार चुकवून काजवे यांनी पळ काढला आणि शेजारच्या घरात घुसून त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळी संशयीतांनी शिव्या घालून घरावर फरशीचे तुकडे, वीटा फेकून हल्ला केला. दरवाजावर कोयता मारून दरवाजा मोडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत काजवे हे छतावरून दुसर्‍या गल्लीत जावून पोहचले. तोपर्यंत घटनास्थळी पोलिस आले. त्यानंतर काजवे यांनी सर्व संशयीतांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयीतांवर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. यातील मुख्य संशयीत नंदनवाडे याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT