कोल्हापूर

विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी सतर्कता दाखवित तरूणाला घेतले ताब्यात.

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : थकबाकीमुळे महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर कबनूर (ता.हातकणंगले) महावितरण कार्यालयासमोर आत्महदहन करण्याच्या तयारीत असतांना एकाला पोलिसांनी सतर्कता दाखवित ताब्यात घेतले. विकी गजानन धुमाळ (रा.३८, जयहिंदनगर, गल्ली नं.२) असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. माणगाव पाठोपाठ कबनूर येथेही असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

धुमाळ याच्या घरी वडील गजानन नामदेव धुमाळ यांच्या नावाने वाणिज्य विज कनेक्शन आहे. घर बांधतांना हे कनेक्शन घेतले होते. ते घरगुती कनेक्शन करण्यासाठी त्याने महावितरण कार्यालयाकडे पाठपुरावाही केला होता. दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून वीज बील थकीत राहीले. सुमारे १४ हजार इतकी ही रक्कम थकीत आहे. याबाबत महावितरण कंपनीकडून धुमाळ यांचे आज सकाळू वीज कनेक्शन खंडीत केले गेले.

त्यामुळे धुमाळ यांनी आज दुपारी कबनूर महावितरण कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल अोतून घेऊन आत्मदहन करण्याची तयारी केली होती. याची कुणकुण लागताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पेट्रोल असलेली बाटली जप्त केली. पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला. धुमाळ याला शिवाजीनग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माणगाव येथे कालच असाच प्रकार घडला होता. आता कबनूरमध्येही हा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT