Attempt self immolation of four families with children in front of District Collector Office in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आपल्या लहान मुलांसह कुटुंबातील चौघांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

निवास चाैगले

कोल्हापूर  : जमिनीच्या वादातून चार कुटुंबांतील सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन या चार कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे, पालकमंत्री सतेज पाटीलही कार्यालयात उपस्थित होते. जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे. जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या सर्वांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

आंदोलकांकडून मिळालेली माहिती अशी 

पाचगाव रस्त्यावरील डिव्हिजन सर्वे क्रमांक तीनवरच्या एकाच प्लॉटच्या उताऱ्यावर तिघांची नावे नोंद झाली आहे. यासाठी पाचगाव ग्रामपंचायत, करवीर तहसील, प्रांत ऑफिसकडे याबाबत तक्रार केली आहे. बेकायदेशीर उतारा रद्द करावा, अशी मागणी या चार कुटुंबांतील लोक वारंवार करत आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सध्या या ठिकाणी एका समाजाच्या इमारत बांधण्याचे बांधकाम सुरू आहे. त्याला ग्रामपंचायत आणि तलाठी यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही या कुटुंबीयांनी केला आहे.वारंवार जिल्हा प्रशासनाकडे देखील याबाबत न्याय मागितला असता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबीयातील मारुती भालकर यांनी केला. न्याय मिळत नसल्याने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासन कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन केले असल्याचे मारुती भालकर यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT