कोल्हापूर

हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

बाळासाहेब कांबळे

हुपरी : राहत्या घराचा उतारा देत नसल्याच्या कारणावरून पालिकेच्या आवारात एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शशिकांत लक्ष्मण खोत (रा. कागल वेस हुपरी) असे त्याचे नाव आहे. उपस्थित नगरसेवक, अधिकारी व नागरिकांच्या प्रसंगावधानाने शशिकांतचा आत्मदहनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

दरम्यान, घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या खोत याच्या भावाची महिला अधिकाऱ्याशी जोरदार शिवीगाळ व बाचाबाची झाली. याप्रकरणी हुपरी पोलिसांत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शशिकांतसह भाऊ चंद्रकांत याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे पालिका परिसरात खळबळ उडाली होती. 

संशयित शशिकांत खोत याने सकाळी कर अधिकारी अश्विनी अडसूळ यांच्याकडे उतारा देण्याची मागणी केली. त्या वेळी अधिकारी अडसूळ यांनी पाणीपट्टीचे सहा हजार थकीत असून उतारा देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून मग सांगतो, असे सांगितले. 

त्यानंतर शशिकांत याने बाहेर जात आरडाओरडा करत व्हरांड्यात कॅनमधून आणलेले रॉकेल अंगावर ओतून घ्यायला सुरुवात केली. हा प्रकार समजताच अधिकारी, नगरसेवक व इतरांनी तत्काळ धाव घेत शशिकांत यास अटकाव करत हातातून कॅन, आगपेटी हिसकावून घेतला. 

दरम्यान, खोत याचा भाऊ घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करत होता. ही बाब समजताच अधिकारी अडसूळ यांनी त्यास मज्जाव करत मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दोघांत झटापट, तसेच बाचाबाची झाली. अचानकपणे उद्भवलेल्या या प्रकारामुळे अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. अधिकारी अश्विनी अडसूळ यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी पोलिस ठाण्यात उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT