Attempts to burn the girl with petrol 
कोल्हापूर

भररस्त्यात तरुणीला पेट्रोलने पेटवण्याचा प्रयत्न

विवेक दिंडे

पेठवडगाव : तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संग्रामसिंह दशरथ गुडेकर (वय 24, रा. शिंदेवाडी, ता. पन्हाळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तरुणास अटक केली असून त्याला वडगाव न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. 
नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील युवतीशी झालेल्या ओळखीतून प्रेमाचे नाटक करून, लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर संग्रामसिंह गुडेकर याने पन्हाळा येथील लॉजवर शारीरिक संबंध ठेवले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढले होते. त्यानंतर तो पीडित युवतीला वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वाघबीळ, वडणगे येथील लॉजवर वारंवार बलात्कार करीत होता. 
दरम्यान पीडित तरुणीने लग्न कधी करणार असे मोबाईलवरून विचारले असता त्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे सांगून तिच्याशी बोलणे बंद केले होते. दरम्यान, संग्रामसिंह याने मी दिलेल्या वस्तू परत कर असे सांगितले होते. त्या वस्तू परत करण्यास पीडित तरुणी वारणानगर येथे मैत्रिणीसोबत गेली होती. वारणानगर येथे वस्तू परत कून गावातील युवक महेश फुणे याच्यासोबत ती परत येत असताना संग्रामसिंह याने या तरुणीच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूचे लोक जमल्याने संग्रामसिंह तेथून पळून गेला. तरुणीने घडला प्रकार वडिलांना सांगून वडगाव पोलिसांत युवकाविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी संशयित गुडेकर याच्यावर वडगाव पोलिसांनी अनुसूचित जाती अत्याचार, जीवे मारण्याचा प्रयत्न, बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केले. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT