Attention to today's hearing on the allocation of Finance Commission funds 
कोल्हापूर

वित्त आयोग निधी वाटपाबाबत आजच्या सुनावणीकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी (ता. 6) सुनावणी होत आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर याचिकाकर्त्या वंदना मगदूम यांच्याकडून याचिकेत दुरुस्ती केली आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. 
माजी महिला व बालकल्याण समिती सभापती मगदूम यांनी 15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाला आव्हान दिले आहे. 
जिल्हा परिषद पदाधिकारी निधी वाटपात मनमानी करत निधी वाटपाबाबत त्यांनी तक्रार केली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने काही मुद्यांबाबत याचिका कर्त्यांना दुरुस्ती करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार ही दुरुस्ती केली आहे. 
जिल्हा परिषद अध्यक्षांना सर्वसाधारण सभेचे अधिकार देता येत नसल्याची भूमिका याचिकाकर्त्यांनी घेतली आहे. तसेच स्वनिधी वाटप करत असताना सर्व सदस्यांना 3 लाख रुपये निधी देण्याचे निश्‍चित केले होते. मात्र अध्यक्षांनी आपल्या खासगी हायस्कूलसाठी स्वनिधीचा गैरवापर झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश येण्यापूर्वीच जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभा घेतली आहे. 
या सभेच्या वैधतेलाही याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले आहे. जिल्हा परिषदेतील कारभाराबाबत याचिका दाखल होऊ लागल्या आहेत. 
याच 15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाबाबत भाजपाकडूनही एक याचिका दाखल केली आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT