Attractions of 3D decoration ... decorations to climb Bappa's decoration! 
कोल्हापूर

आकर्षण थ्रीडी डेकोरेशनचे... बाप्पांच्या सजावटीला चढणार साज!

नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  गणेशोत्सवात घरोघरी काय आरास करायची, असा प्रश्‍न घरातील आबालवृद्धांना पडतो. दरवर्षी नवी सजावट करण्याकडे सर्वांचाच कल असतो. यंदा या सजावटीला साज चढवणारे थ्रीडी डेकोरेशन लक्षतीर्थ वसाहतीतील रोहन रेडेकर यांनी साकारले आहे. विविध डिझाईन्स, नक्षी असलेल्या या थ्रीडी डेकोरेशनचे सर्वांनाच आकर्षण लागून राहिले आहे.

रेडेकर लहान मुलांसाठी मोफत अभ्यासिका, बालग्रंथालय चालवतात. कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांना भरपूर मोकळा वेळ मिळाला. यावेळेचा सदुपयोग करत रेडेकर यांनी थ्रीडी डेकोरेशनची माहिती इंटरनेट, व्हिडीओंद्वारे मिळवली. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर त्वरित त्यांनी यासाठी लागणारे साहित्य घेतले आणि थ्रीडी डेकोरेशनचा एक प्रयोग करून पाहिला. तो यशस्वीही झाला. या सजावटीच्या विविध संकल्पना कशा असतील, याचा विचार केला. त्या अनुषंगाने विविध चित्रे काढली. त्याच्या प्रतिकृती तयार करणारा या चित्रांच्या प्रिंट मारल्या आणि हुबेहुब ते ठिकाण डोळ्यासमोर येईल, अशी सजावट केली. 

गणेशोत्सवात घरगुती सजावटीसाठी बाजारात विविध मकर मिळतात. मात्र, काही मोठ्या मकरांमध्ये गणेशमूर्तींची पूजा करणे शक्‍य होत नाही. याचाच विचार करून त्यांनी या थ्रीडी मकराची उंची पाच फुट व लांबी सहा इंच इतकी ठेवली. हे थ्रीडी मकर करण्यासाठी त्यांना एक दिवसाचा कालावधी लागतो. 

या आहेत डिझाईन्स 
प्राचिन मंदिरे, श्री अंबाबाई मंदिरातील प्रभावळ, जंगल आणि विविध झाडांच्या प्रतिकृती 

लॉकडाउनमध्ये नवीन काही शिकावे अशी इच्छा होती. यावेळेत थ्रीडी मकर बनविण्याची माहिती घेतली. सध्या मी पाच ते सात प्रकारची मकरे तयार केली आहेत. ती थ्रीडी असल्यामुळे त्याला पसंतीही मिळत आहे. 
रोहन रेडेकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT