atyal unique village in Kolhapur that illuminates the life of the blind 
कोल्हापूर

अंधांचे जगणे प्रकाशमय करणारे कोल्हापुरात आहे 'हे' आगळेवेगळे गाव

अजित माद्याळे

कोल्हापूर :  अत्याळने नेत्रदानाच्या माध्यमातून अंधांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम अव्याहत सुरू ठेवले आहे. हे वेगळेपण त्यांनी स्वत:पुरते मर्यादित न ठेवता शेजारील गावांनाही या वाटेवरून चालण्याइतपत सक्षम केले आहे.  नेत्रदानाबाबत अत्याळ इतरांसाठी वाटाड्या ठरत आहे.
 

समाजात अंधांची संख्या मोठी आहे. सामाजिक संस्था काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. शासनाकडून योजनांचा आधार दिला जातो; पण त्यांना खरी गरज असते ती दृष्टीची. त्यासाठी आवश्‍यकता असते नेत्रदानाची आणि नेमके हेच काम प्रभावीपणे होत नव्हते. ही बाब हेरून अत्याळ ग्रामस्थांनी सहा वर्षांपूर्वी मरणोत्तर नेत्रदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.


याची पार्श्‍वभूमीही मोठी रोचक आहे. पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या अत्याळमध्ये ऐक्‍यातून अनेक कामे झाली आहेत. पूर्वजांचा इतिहास न सांगता त्यामध्ये भर घातली पाहिजे, याच विचारातून गावात चळवळीचा उगम झाला. स्थानिक नेते- कार्यकर्त्यांत टोकाचा राजकीय संघर्ष असला तरी गावच्या विकासासाठी सारे एकत्र येतात, ही बाब चळवळीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. नेत्रदानाबाबत जाणीव-जागृती निर्माण करणे तसे अवघड; पण प्रबोधनाच्या पातळीवर गावातील प्रत्येक घटकाने झोकून देऊन काम केल्यामुळे गेल्या सहा वर्षांत 24 ग्रामस्थांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे.


अत्याळकरांनी परीघ विस्तारत शेजारील बेळगुंदी, करंबळी, ऐनापूर, कौलगे, भडगाव, नूल, शिप्पूर तर्फ आजरा येथेही चळवळ रुजवली आहे. त्यामुळेच तेथूनही मोठा प्रतिसाद आहे. अत्याळकरांच्या पणतीने या प्रत्येक गावात चळवळीची ज्योत प्रज्वलित झाली आणि त्यातून अंधांच्या जीवनातील अंधकार दूर होत आहे.


कार्यकर्ता हेच सर्वोच्च पद
चळवळीची कोणतीही समिती नाही. कार्यकर्ता हेच सर्वोच्च पद आहे आणि प्रत्येक ग्रामस्थ चळवळीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे श्रेयवादाचा मुद्दा गळून पडला आहे. कोणत्याही सामाजिक कामाला पैशापेक्षा माणसांची अधिक गरज असते. हेच सूत्र अवलंबून चळवळ "झिरो बॅलन्स'वर सुरू आहे. आगाऊ निधी जमा केला जात नाही. हार, सत्कार, पुरस्काराला फाटा दिला आहे. मोठे काम उभारूनही गेल्या सहा वर्षांत एकाही कार्यकर्त्याने सत्कार स्वीकारलेला नाही. पुरस्कार तर दूरची गोष्ट आहे. फक्त नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचाच गौरव होतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यात त्यागाची भावना रुजली आहे.

चळवळीत एकमेकांच्या कामाचे मोजमाप केले जात नाही. प्रत्येकाने शक्‍य तितका वेळ चळवळीसाठी द्यावा, एवढीच अशी अपेक्षा ठेवली जाते. चळवळीची उभारणी समान न्याय तत्त्वावर झाली आहे. अगदी कार्यक्रमातही व्यासपीठावर फक्त प्रमुख पाहुण्यांची खुर्ची असते. सरपंचांसह सर्वच मान्यवर व्यासपीठासमोरील खुर्चीवर बसतात. त्यामुळे आपण सारे एक, हा विचार पक्का झाला आहे. चळवळीत "मी' ऐवजी "आम्ही' या शब्दाला महत्त्व आहे आणि तोच आत्मा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने हा आत्मा सांभाळला आहे.


अत्याळमधील नेत्रदाते...
पद्मावती पाटील, हौसाबाई माने, गंगूबाई मोहिते, धोंडिबा खडके, जनाबाई सुतार, अनुसया पाटील, मारुती खोराटे, तुकाराम घोरपडे, दत्तू पाटील, अक्काताई माने, बंडू पाटील, नारायण पाटील, शंकर माने, बाबू पाटील, बायाक्का पाटील, तुकाराम मस्कर, ताराबाई गोडसे, नारायण माने, संगीता सुर्वे, शंकर घोरपडे, केशव माने, पार्वती बाबर, मालूबाई पोवार, मंगल माने.


इतर गावांतील नेत्रदाते...
लक्ष्मीबाई गुरव, रामू केसरकर, नीळकंठ गावडे, कलगोंडा पाटील, शंकर पाटील, तुकाराम केसरकर, शंकरगोंडा पाटील (सर्व बेळगुंदी). अन्नपूर्णा खानापुरे, प्रकाश खानापुरे, अशोक चव्हाण (सर्व नूल). संतोष सलपे, शांताबाई येसादे (सर्व करंबळी). लीलाबाई माने, इंदूबाई देसाई (सर्व ऐनापूर). विश्‍वनाथ होरकेरी, अक्काताई पाटील (सर्व गडहिंग्लज). कलाप्पा जकाप्पगोळ (भडगाव). बहुळाताई रावण (कौलगे), कृष्णा पोवार (शिप्पूर तर्फ आजरा).

डॉ. सदानंद पाटणे यांचे सहकार्य
ग्रामस्थांनी ऐक्‍याच्या जोरावर चळवळ उभारली असली तरी त्याला गडहिंग्लज येथील अंकुर आय हॉस्पिटलचे डॉ. सदानंद पाटणे यांचे मोलाचे सहकार्य आहे. मृत व्यक्तीचे नेत्रदान घेण्याची तांत्रिक जबाबदारी डॉ. पाटणे व त्यांचे तज्ज्ञ पथक पार पाडते. अंकुर हॉस्पिटलमध्ये शासनाने आय रिट्रायव्हल सेंटरही मंजूर केले आहेत. प्रसंगी व्यवसायाकडे दुर्लक्ष करून डॉ. पाटणे यांनी तोलामोलाची साथ या चळवळीला दिली आहे.

""गावात 29 ऑक्‍टोबर 2012 ला चळवळीची सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आईचे निधन झाले. आम्ही नातेवाइकांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला. गेल्या सहा वर्षांत 24 वे नेत्रदान झाले. शेजारील गावातही चळवळ रुजल्यामुळे तेथूनही नेत्रदान होत आहे.'' 
- जयसिंग पाटील ,पहिल्या नेत्रदात्या कै. पद्मावती पाटील यांचे चिरंजीव, अत्याळ

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळ

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT