The auditor revealed the clutter of private hospital bills 
कोल्हापूर

धक्कादायक : एकाच पीपीई किटचे बिल लावले तब्बल 14 जणांना

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : एकच पीपीई किट वापरून त्याचे बिल वॉर्डमधील तेरा-चौदा जणांवर स्वतंत्र लावले जाते. आयसीयुच्या बिलात स्वच्छतेचे बिल असतानाही ते स्वतंत्र लावून खासगी डॉक्‍टर रुग्णांकडून अवाजवी बिलाची वसुली करत असल्याची माहिती रुग्णालयांवर लक्ष ठेवणाऱ्या ऑडिटरांच्या माध्यमातून पुढे आली आहे. जादा बिल लावणाऱ्यांना नोटिसा पाठवा, गुन्हा दाखल करा, अशा शब्दांत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना आज सायंकाळी सांगितले. 


खासगी रुग्णालयांत शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक बिलांची आकारणी होत आहे. अनेक रुग्णांकडून जादा रक्कम आकारणी करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने प्रत्येक हॉस्पिटलमधील बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरांची नियुक्ती केली आहे. त्यांनाही डॉक्‍टरांकडून जुमानले जात नाही. वारंवार विनंती करून खासगी रुग्णालयांकडून बिलांची माहिती घेण्याची वेळ ऑडिटरांवर आली आहे.

 
याबाबत आज जिल्हाधिकारी यांनी ऑडिटरांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टीसुद्धा होते. ऑडिटरांची माहिती देताना आयुक्त कलशेट्टी म्हणाले, ""तीन दिवसांत 27 बिलांची तपासणी केली. यामध्ये 2 लाख 83 हजार रुपये जादा आकारल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे संबंधित डॉक्‍टरांना हे बिल कमी करण्यास भाग पाडण्यात आले. डॉक्‍टरांशी चर्चा करून योग्य बिल आकारण्याची समज दिली आहे. आज रात्रीसुद्धा डॉक्‍टरांच्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या डॉक्‍टरांची चर्चा होणार आहे.'' 


दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसमोरच असलेल्या ऑडिटरांनी त्यांची व्यथा सांगितली. ते म्हणाले, ""आम्हाला कोण विचारत नाही. बिलांचा तपशील देत नाहीत. स्वतःचे ओळखपत्र दाखविल्यानंतर ही बिलांची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सहा दवाखान्यांत एक लाख 3 हजार रुपये कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. एकच पीपीई किट वापरतात आणि आयसीयूमधील प्रत्येक रुग्णाला त्याचे स्वतंत्र बिल आकारतात. प्रत्यक्षात दिवसभरात किती पीपीई किट वापरले आहेत. त्याचा खर्च आयसीयुतील सर्व रुग्णांवर समान लावणे आवश्‍यक आहे, तरीही प्रत्येकाचे स्वतंत्र बिल लावून लूट सुरू आहे. स्वच्छतेचे पैसे प्रत्येक रुग्णांकडून जादा हजार रुपये घेतले जातात. प्रत्यक्षात ते आवश्‍यक नाहीत.'' 


ज्या रुग्णालयांकडून जादा बिल आकारले जाते त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा. पीपीई किट, स्वच्छेतेसाठी स्वतंत्र पैसे लावून रुग्णांकडून अवाजवी आकारणी करण्यात येत आहे. ऑडिटरांना तातडीने माहिती दिलीच पाहिजे. जे माहिती देत नाहीत त्यांना नोटिसा पाठवा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आयुक्त कलशेट्टी यांना दिल्या आहेत. 

आज मृत्यू उद्या बिल 
कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांकडून आज बिल घेतले आहे, मात्र त्याचे बिल ऑडिटरांनी मागितले तेंव्हा उद्या, या असे सांगण्यात आले आहे, असे का याबाबत ऑडिटरांनी विचारले असता त्यांना "उद्याच या' असे खासगी रुग्णालयांतून सांगण्यात आल्याचे खुद्द ऑडिटरांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT