Average rainfall in less days; Risk of such a situation by 2030 
कोल्हापूर

कमी दिवसांत पावसाची सरासरी पूर्ण ;  2030 पर्यंत अशा परिस्थितीचा धोका 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : जिल्ह्यात सरासरी 1200 मिलिमीटर पाऊस 120 दिवसांत पडतो; मात्र काही वर्षांत सरासरीएवढा पाऊस 40 ते 50 दिवसांतच पडू लागला आहे. ऑगस्टमध्ये पावसाच्या सरासरीचे प्रमाण वाढते. कमी दिवसांत जास्त पाऊस पडल्याने महापूर येतो. 2030 पर्यंत महापुराचे संकट आणखी वाढणार आहे, असे मत कृष्णा खोऱ्यातील महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने व्यक्त केले आहे. 
कोल्हापूर जिल्ह्यात चांगला पाऊस पडतो. धरणे, बंधारे, लघु व मध्यम प्रकल्पांमधून पाणी साठवले जाते. जिल्हानिहाय कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल, याचा अंदाजही वर्तवून वेळापत्रक बनवले जाते. या वेळापत्रकानुसार जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या 120 दिवसांच्या कालावधीत सुमारे 1200 मिलिमीटर पाऊस पडतो; मात्र 10 ते 15 वर्षांपासून पावसाचे हे वेळापत्रकच बिघडले आहे. 
जिल्ह्यात वर्षाला पावसाची सरासरी पूर्ण होते; मात्र हा पाऊस ठरावीक दिवसांतच पूर्ण होतो. 
ऑगस्टमध्ये वेळापत्रकानुसार अपेक्षित पावसापेक्षा जास्त पाऊस पडतो. यामुळे महापूर येतो. या कालावधीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जेवढा पाऊस पडतो तेवढाच किंवा त्याहून जास्त पाऊस अन्य क्षेत्रातही पडतो. पर्यायाने नदीपात्रातील अतिरिक्त पाणी पसरते. पाण्याचा फुगवटा तयार होतो. पाणी भागात पसरते. 
पावसाचे वेळापत्रक बिघडण्यास जागतिक तापमानवाढ हे महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय मॉन्सूनच्या काळात येणाऱ्या समुद्रातील वादळांमुळेही पावसाच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. 2019 मध्ये आलेल्या महापुरानंतर शासनाने एक तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीने पावसाचे बिघडलेले वेळापत्रक हे महापुराचे महत्त्वाचे कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. 


ेवेळापत्रक बिघडल्याचे दुष्परिणाम 
* शेतीचे प्रचंड नुकसान 
* महापुराचा फटका 
* जीवित व वित्त हानी 
* जनजीवन विस्कळित 

ऑगस्टमध्ये अधिक पाऊस पडल्याने सरासरी पूर्ण होते. धरणे भरतात; मात्र यामुळे महापुराचा धोकाही निर्माण होतो. भविष्यात याचे स्वरूप आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे नद्यांचे खोलीकरण, काही पुलांची पुनर्बांधणी, नाल्याचे रुंदीकरण, पूररेषेची अंमलबजावणी अशा गोष्टी करण्याची आवश्‍यकता आहे. 
- उदय गायकवाड, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT