Awaiting approval of piped gas scheme in the city, municipal office firecrackers 
कोल्हापूर

शहरात पाईपने गॅस पुरवठ्याची योजना मंजुरीच्या प्रतिक्षेत, महापालिकेच्या दफ्तरदिरंगाईचे फटाका

डॅनिअल काळे

कोल्हापूर ः शहराला पाईपलाईनने गॅस पुरविण्याच्या योजनेच्या काम अजूनही महापलिकेच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. ठरावाला वेळ. झालेल्या ठरावावर सही व्हायला वेळ गेला. आता ठराव होउनही उर्वरित प्रक्रियेच्या फेऱ्यात हे काम अडकले असून चांगली योजनेलाही महापालिकेच्या दफ्तरदिरंगाईचा फटका बसला आहे. महापालिकेच्या या सर्व प्रस्ताव, मंजूऱ्या, ठरावाच्या प्रतिक्षेत नळाव्दारे स्वस्तातला गॅस येण्याचे काम गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. 
पहिल्या टप्यात कोल्हापूर शहरात 129 किलोमीटरची पाईपलाईन होणार आहे. या पाईपलाईनसाठी संबधित कंपनीने खुदाईची परवानगी मागताच त्यासाठी 66 कोटींची मागणी महापालिकेने केली होती. तथापी, इतके शुल्क भरणे कंपनीला परवडणारे नसुन हे कामही लोकहिताचेच असल्याने विनाशुल्क परवानगी मिळावी, अशी कंपनीने मागणी केली होती. त्यानंतर कमी रकमेचा आणखी एक प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रक्रियेत वर्षभर काम रेंगाळत गेले. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका करत नगरसेवकांनी हे काम लवकर करावी,अशी टिका टिप्पणी केली होती. संभाजीराजे यांच्या या टिका टिपण्णीनंतर मावळत्या सभागृहाने जाता जाता या गॅस पाईपलाईनच्या कामाला मंजूरी देण्याचा ठराव उपसूचनेसह मंजूर केला. महापालिकेच्या दफ्तर दिरंगाईचा फटका या कामाला बसला असून सुमारे वर्षभर कागदपत्राचा खेळ रंगला होता. एवढ्या काळात या गॅसपाईपलाईनचे काम पुर्ण होउन नागरिकांना नळाव्दारे गॅसही पोहचला असता.पण एखाद्या कामात महापालिकेचा अनुभव कसा येतो,याचा हा उत्तम नुमना आहे. 


उपसूचनेत रिस्टोरेशनची जबाबदारी कंपनीवर 
महापालिकेच्या सभागृहाने प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करुन मंजूरीचा हा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर केला. गॅस पाईपलाईनचे काम करताना जी रस्ते खोदाई होईल ते रस्ते पुन्हा दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी संबधित कंपनीवर दिली आहे. सिमेंटचा रस्ता खोदला तर सिमेंटचा आणि डांबीरचा रस्ता खोदला तर डांबरी रिस्टोरेशन करुन देण्याच्या अटीवर हा ठराव सभागृहाने मंजूर केला आहे. 

गॅस पाईपलाईनच्या खोदाईला परवानगी देण्यासंदर्भात प्रस्ताव, ठराव आदी प्रक्रिया पुर्ण झाली असून आता अनामत रक्कम भरुन घेणे व अन्य कांही प्रक्रिया पार पडली जाईल. येत्या आठवड्याभरात हा प्रश्‍न निकाली निघेल.- शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT