कोल्हापूर

आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या यशवंत ग्रामपंचात पुरस्कारावर अखेर शिक्‍का मोर्तब

सदानंद पाटील

कोल्हापूर : सन 2018-19 सालात वादग्रस्त राहिलेला व भाजपच्या सत्ताकाळात सत्ताधाऱ्यांमध्येच झालेल्या आरोप-प्रत्यारोपाने चर्चेत असलेला यशवंत पुरस्कार जाहीर केला. माणगाव (ता. हातकणंगले) व हत्तीवडे (ता.आजरा) यांना हा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार विभागून देण्यात आला. 
अध्यक्ष बजरंग पाटील यांनी या पुरस्कारावर शिक्‍का मोर्तब करण्यात आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक व महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यात या पुरस्कारावरुन जोरदार खडाजंगी झाली होती. 
उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत व सरपंच यांना यशवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जिल्हा परिषद स्वनिधीतून 2004-05 सालापासून ही योजना सुरु केली. या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातून प्रस्ताव मागणी केले जातात. प्रत्येक तालुक्‍यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस रक्कम रुपये 25 हजार, दुसरा क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस 15 हजार रुपये देण्यात येतात, तर संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बक्षीस म्हणून 1 हजार रुपये व पदक देण्यात येते, तर जिल्ह्यातून अतिउत्कृष्ट निवड केलेल्या ग्रामपंचायतीस 50 हजार तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ग्रामपंचायतीस 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येते. 
यशवंत पुरस्कार योजना सन 2018-19 साठीच्या उत्कृष्ट ग्रामपंचायत व सरपंच पुरस्कारसाठीची निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायतीसाठी ग्रामपंचायत हत्तीवडे (ता.आजरा) व माणगाव (ता. हातकणंगले) यांना समान गुण मिळाले. यातूनच गावांच्या निवडीत वशिलेबाजी होत असल्याचा आरोप राजू मगदूम यांनी केला. त्याला राहुल आवाडे यांनी साथ दिली. यातूनच माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यात वाद झाला. यानंतर पुन्हा चौकशी समिती नेमून पाहणी करण्यात आली. दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण आल्याने हा पुरस्कार विभागून देण्याचा निर्णय झाला. 


ज्या पुरस्कारासाठी वाद झाले, मतभेद झाले, तो पुरस्कार आज माझ्या गावाला विभागून मिळाला, याचा आनंद आहे. गाव मोठे असताना छोट्या गावाबरोबर स्पर्धा लावणे योग्य नाही. यामध्ये बदलदेखील करणे गरजेचे आहे. पुरस्काराने आमच्या गावातील विकासकामांवर शिक्‍कामोर्तब झाला आहे. संपूर्ण माणगाव ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. आज या सर्व श्रमाला न्याय मिळाला आहे. 
-राजू मगदूम, माजी सरपंच माणगाव.

संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT