The ax turned on the vineyard at Danoli 
कोल्हापूर

दानोळीत द्राक्षबागेवर कुऱ्हाड 

युवराज पाटील

दानोळी ः तीन वर्षांपासून सातत्याने प्रतिकुल हवामान, रोगांचा प्रादुर्भाव, बेदाण्याला कमी दर, शासनाचे चुकीचे धोरण आदी कारणाला वैतागुन दानोळी येथील अनिल बापूसो मोटके यांनी अडीच एकर द्राक्षबागेवर ऐन हंगामात कुऱ्हाड फिरवली आहे.

तीन वर्षांपासून सातत्याने नुकसानीत जाणाऱ्या बागेमुळे बाग तोडली आहे. 2018 चा हंगाम आगाप छाटणी घेऊनही दावण्याच्या तावडीत सापडला. 2019 चा हंगाम महापूर व अतिपावसाने नुकसानीत आला. यंदा एक महिना उशीरा छाटणी घेऊनही परतीच्या पावसाने तडाखा दिला. फ्लावरिंग स्टेजला असणारी द्राक्षे कुजुन गेली. सरासरी अडीच एकरामध्ये 30 टन निघणारा माल 2018 ला अवघा अडीच टन निघाला. गेल्यावर्षी तर फक्त 170 किलो निघाला. यावर्षीही तशीच स्थिती राहिल्याने वैतागून बाग तोडली.

तीन वर्षांत 11 लाख 87 हजार रुपये खर्च केला. उत्पन्न मात्र 1 लाख 64 हजार रुपये मिळाले. 15 वर्षांपूर्वी बेदाण्याला सरासरी 150 रुपयांपेक्षा अधिक दर होता. सध्या सरासरी 130 रुपये दर आहे. उत्पादन खर्च मात्र चार ते पाच पटीने वाढला आहे. त्यामुळे द्राक्ष शेती नुकसानीची ठरत आहे. बेदाण्याला 120 रुपये दर म्हणजे प्रतिकिलो द्राक्षाला 25 रुपये दर. याच्यापेक्षा भाजीपाल्याला दर जास्त आहे. वर्षभराचे एकच पीक असून लाखो रुपये खर्चून एवढेच उत्पन्न मिळणे म्हणजे नुकसानीची शेती ठरत आहे. बागेसाठी काढलेले कर्जही 3 लाखांवर असल्याने कर्जमाफीतून वगळले आहे. परतीच्या पावसाने पंचनामे करताना काढणीयोग्य माल असेल तरच पंचनाम्याचे आदेश असल्याचे सांगून पंचनामे केलेले नाहीत. 


उत्पादन खर्च चौपट, दर तेवढाच 
सतरा वर्षांत द्राक्षबागेचा उत्पादन खर्च चौपट झाला आहे. खत, औषधे, मजुरी व मशागतीच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. बेदाण्याचा दर मात्र दीडशेवरून 130 रुपयांवर आला आहे. 


14 वर्षांपासून द्राक्ष बाग आहे. तीन वर्षांपासून बाग नुकसानीत आहे. आतापर्यंत बागेवर लाखो रुपये खर्च झाले. परतीच्या पावसाच्या तडाख्याने यंदाची बागही वाया गेली होती. राहिलेले घड टिकवणे आणि पुढील खर्च सोसवेना म्हणून बागच तोडण्याचा निर्णय घेतला. 
- अनिल मोटके, द्राक्षबागायतदार 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

Sangli Atrocity Case: संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत ॲट्रॉसिटीखाली गुन्हा; २५ लाखांच्या व्यवहारातून जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Producer R B Choudary Passed Away : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; सुप्रसिद्ध निर्माता आर.बी. चौधरी यांचे अपघातात निधन

SCROLL FOR NEXT