Ayodhya Ram Mandir SriRama Dasara Chowk Kolhapur esakal
कोल्हापूर

ऐतिहासिक दसरा चौकात उभारली प्रभू श्रीरामांची तब्बल 108 फुटी भव्य प्रतिमा; मंत्री पाटील, महाडिकांच्या उपस्थितीत आज अनावरण

अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पणानिमित्त येथे होणाऱ्या आनंदसोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीराम आणि मंदिर प्रतिकृती असलेल्या भगव्या ध्वजासह टी-शर्ट, आकाशकंदिलांना मागणी वाढली आहे.

कोल्हापूर : अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पणानिमित्त येथे होणाऱ्या आनंदसोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काल रात्री ऐतिहासिक दसरा चौकात (Dasara Chowk) प्रभू श्री रामांची १०८ फुटी भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. आज (शनिवारी) दुपारी साडेबारा वाजता राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण होणार आहे.

दरम्यान, रविवार (ता.२१) पासून सलग दोन दिवस येथे आनंदसोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, श्रीराम आणि मंदिर प्रतिकृती असलेल्या भगव्या ध्वजासह टी-शर्ट, आकाशकंदिलांना मागणी वाढली आहे.

शिवाजी चौकात प्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रसारण

श्री राम मंदिर लोकार्पण (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवार (ता.२१) पासून येथे आनंदोत्सव सोहळा होणार आहे. छत्रपती शिवाजी चौकात अकरा फुटी भव्य मुर्ती दर्शनासाठी खुली होणार आहे. त्याशिवाय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रसारण सोमवारी (ता.२२) दुपारी बारापासून होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख संभाजी साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (ता. २२) सकाळी गाईच्या पूजनानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर सप्तगंगेच्या जलाने जलाभिषेक होवून गुढी उभारली जाईल, असे प्रसाद वळंजू यांनी सांगितले. यावेळी विशाल पाटील, अवधूत भाटे, पांडुरंग पाटील, अमोल पाटील, सुहास शिंदे आदी उपस्थित होते.

धार्मिक स्थळे, मंदिरांची स्वच्छता

रुईकर कॉलनी परिसरातील मंदिरांची खासदार धनंजय महाडिक यांनी आज महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्वच्छता केली. महापालिकेच्या वतीने शहरातील मंदिरांची व मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील २०९ मंदिरांची स्वच्छता झाली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, माजी नगरसेवक सत्यजित कदम, वैभव माने, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह महापालिकेच्या तीनशे कर्मचाऱ्यांचा मोहिमेत सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT