Babu lost his voice of affection; Exit of Baburao Gurav from Ahar Hotel 
कोल्हापूर

बाबुचा आपुलकीचा आवाज हरपला  ; आहार हॉटेलमधील बाबूराव गुरव यांची एक्‍झिट

संदीप खांडेकर

कोल्हापूर : "बोला काय देऊ? मिसळ गरम आहे. देऊ का?,' प्रत्येकाच्या परिचयाचा हा आवाज, कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटीवरच्या आहार हॉटेलमध्ये पाऊल टाकताच तो ऐकायला मिळणार, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांचे या आवाजाशी एक वेगळेच नाते. 
हा आवाज मात्र आज हरपला आणि अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. "बाबू' ऊर्फ बाबूराव चिमाजी गुरव यांनी आयुष्यातून आज एक्‍झिट घेतल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. 
श्री. गुरव काही दिवस आजारी होते. बालाजी पार्कमध्ये ते राहायला होते. वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी त्यांची एक्‍झिट घेतल्याने त्यांचा मित्र परिवार आज अस्वस्थ झाला. खाकी शर्ट व हाफ पॅंटमधला बाबू अर्थात बाबूराव 40 वर्षे हॉटेलाच्या सेवेत होते. मिसळ देण्यातील त्यांची स्टाईल फेमस होती. "बोला काय देऊ? मिसळ, शिरा, उप्पीट, पोहे, कांदाभजी?,' ही त्यांच्या घोगऱ्या आवाजातील विचारणा ग्राहकांच्या मनात उतरायची. कोणत्या टेबलवरचे बिल किती, हे त्यांच्या डोक्‍यात फिट्ट बसलेले असायचे. ग्राहक टेबलवरून उठून पैसे देताच ते मालकांना "मागचे 34, पयले 76 रूपये' असे सांगायचे. ग्राहकाने उपवासाचे काय विचारायचे आवकाश. त्यांच्या तोंडातून कुंदा, बर्फी, डिंकलाडू, हे पदार्थ लगोलग बाहेर पडायचे. ग्राहकांशी त्यांचे अनोखे नाते तयार झाले होते. त्यामुळे बाबूरावांना कामाची पोचपावती म्हणून ते हळूच नोटही चिकटवायचे. ते नाकारत असले तरी ग्राहक त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या थेट खिशातच घालायचे. इमानेइतबारे सेवा करण्यात त्यांनी कधीच कसूर केली नाही. त्यांची प्रामाणिक सेवा ग्राहक वर्गात कौतुकाची होती. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांना धक्का बसला, शिवाय यापुढे त्यांचा आवाज ऐकायला मिळणार नाही, या विचाराने हुंदका आवरता आला नाही. 


आठवणींना उजाळा 
बाबूराव गुरव यांच्या निधनाची वार्ता मित्र-परिवारासह ग्राहक वर्गात पसरली. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडवून त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT