baby died for Dynamic women in belgaum 
कोल्हापूर

...आणि 'त्या' घटनेने रूग्णालयातील सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोणाच्या नशिबी काय येईल याची शास्वती कधीच नसते. असाच प्रसंग बुधवारी जिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाला. कुणाचाच आधार नसलेल्या एका गतिमंद महिलेने बुधवारी बाळाला जन्म दिला. त्यामुळे त्या वेडसर महिलेसह रुग्णालयातील सर्वांना आंनद झाला. मात्र त्याच रात्री  त्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. 


गावाचा, घराचा पत्ता नसलेली एक महिला डोक्यावर परिणाम झाल्याने बडबड करीत काही वर्षांपासून चिक्कोडी आणी परिसरात वावरत होती. मात्र याच काळात त्या महिलेवर काही जणांनी लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे ती गर्भवती झाली. त्या महिलेला त्याची थोडीही कल्पना नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या महिलेला त्रास होत असल्याने पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तरीही ती महिला नेहमी प्रमाणे वागत होती. परंतु, तिची प्रसूती झाल्यानंतर तिच्या वागण्यात बदल दिसून येत होता. अशी माहिती जिल्ह्या रुग्णालयातील तिच्या कक्षात असणाऱ्या लोकांनी दिली. तिची परिस्तिती सुधारत असतानाच रात्री तिचे बाळ दगावले. त्यामुळे सर्वानाच धक्का बसला असून गतिमंद असतानाही तिच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांचे ओझे घेऊन फिरणाऱ्या त्या गतिमंद महिलेच्या पदरी निराशा पडली आहे. नवजात बालकाचे निधन झाल्यानंतर पोलिसांनी बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुरूवारी सकाळी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मोरे यांनी पुढाकार घेऊन सदाशिवनगर स्मशान भूमीत त्या नवजात बालकावर अंत्यसंस्कार केले. यावेळी निसार, मल्लाप्पा तलवार, संजय वालावरकर आदी उपस्थित होते.

गोकाक व मुरगोड पोलिसांनी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्यानंतर त्या महिलेची माहिती ऐकून धक्काच बसला. कोणतीही महिला असो तिला त्रास होणार नाही, याची दखल घेणे गरजेचे आहे.
विजय मोरे , माजी महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

Thane News: शहाड उड्डाणपुलावर २० दिवस वाहनांना नो एन्ट्री! वाहतूक कशी होणार?

BEST Employees Protest: बेस्ट कर्मचाऱ्यांची आंदोलनाची हाक! मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आक्रमक इशारा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरात शिंदे सेनेच्या मेळाव्यापूर्वी कर्मचाऱ्याला विजेचा धक्का

SCROLL FOR NEXT