baby grabbed the cobras tail in front of the father video is going viral 
कोल्हापूर

व्हिडीओ : हृदयाचा ठोकाच चुकला, वडिलांसमोरच बाळाने धरले नागाचे शेपूट... व्हिडीओ होतोय व्हायरल...

मिलिंद देसाई

बेळगाव - लहान मुले कधी काय करतील याचा नेम नसतो. त्यामुळे अनेकदा त्यांच्या चुकीमुळे मोठा अनर्थ घटल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. असाच एक प्रसंग बेळगाव जवळील गावामध्ये घडला असुन वडीलांसोबत शिवारात गेलेल्या लहान बालकाने चक्‍क नाग सापाला स्पर्श केला. त्यामुळे बाळासह त्याच्या वडीलांच्या हृदयाचा ठोका चुकला मात्र तो साप फणा काढत शिवारातुन दुर गेल्याने त्या बाप लेकाचा जीव वाचला. परंतु आपला लाडका चिमुकला शिवारात बागडत असतानाचा वडीलांनी मोबाईलवर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तो प्रसंग किती भयंकर होता याची कल्पना येत आहे.

शहरापासुन सहा किलो मिटर अंतरावर असणाऱ्या कंग्राळी बुद्रुक येथील एक पालक आपल्या लहान मुलाला घेऊन शिवारात गेले होते. शिवारात गेल्यानंतर तो चिमुकला आनंदात बागडत होता. शिवारातील काम संपल्यानंतर त्याच्या वडीलानी त्याला अनेकदा घरी जाण्यासाठी आवाज दिला तरीही तो ऐकत नसल्याने त्याचा व्हिडीओ करीत आवाज देण्यास सुरुवात केली. वडील व्हिडीओ करीत असताना मुलगा चालत नाग सापाजवळ गेला. तोपर्यंत त्याच्या वडीलांनाही नाग साप शिवारात असल्याची कल्पना नव्हती, मात्र मुलाने सापाला पकडताच सापाने काढलेला फणा पाहुन बाळासह ते प्रचंड घाबरुन गेले आणि पळत बाळाकडे धावले मात्र तो नाग आपल्या मार्गाने परत गेला. बाळाने सापाला समोरुन पकडले असते किंवा सापाने द्वंश केला असता तर ? अशा अनेक शंकांमुळे त्यांचा जीव अनेक तास कासावीस झाला होता.
बेळगाव शहर आणि परिसरातील शिवारात नाग व इतर साप मोठ्‌या प्रमाणात आहेत. त्यामुळे शिवारात गेल्यानंतर सर्वांनीच याबाबत काळजी घेणे आवश्‍यक आहे असे मत या घटनेनंतर व्यक्‍त होत आहे.

घडली नाही अप्रिय घटना

चिमुकल्याने नाग सापाला स्पर्श केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच हिट होऊ लागला आहे मात्र लहान मुले शिवारात किंवा इतर ठिकाणी बागडत असताना पालकांनी अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे. असे मत पालकांमधुन व्यक्‍त होत असुन नाग साप शिवारात शांतपणे पडला होता. त्यामुळेच पालकांना साप दिसुन आला नाही मात्र, सुदैवानेच यावेळी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT