bad condition for ground in kolhapur 
कोल्हापूर

याला मैदान म्हणायचे का? 

सकाळ वृत्तसेवा

आर. के. नगर (कोल्हापूर) - सागरमाळ-रेड्याच्या टक्करीजवळ असलेल्या वि.स.खांडेकर विद्यालयाच्या मैदानाची दुरावस्था झाली आहे. चक्क मैदानात कोंडाळा आणून ठेवला आहे. मैदान आहे की कचरा कोंडाळा हेच कळत नसल्याची स्थिती मैदानाची झाली आहे. येथील दुरावस्था तातडीने दूर न झाल्यास भविष्यात हे मैदान म्हणजे कायमस्वरुपी कोंडाळा होण्याची भीती आहे. 

सागर माळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळावर महापालिकेची वि.स.खांडेकर प्राथमिक शाळा आहे. या शाळेसाठी असलेल्या मैदानाची सध्या दुरवस्था झाली आहे. संपूर्ण मैदानातील काही भाग स्केटिंगसाठी तर एक कोपरा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी दिला आहे. उर्वरित भागात खडी अस्ताव्यस्त पडली आहे. कचरा कोंडाळा आणून ठेवला आहे. अनेकांनी शॉर्टकट म्हणून येथे रस्ता तयार केला आहे. वि. स. खांडेकर शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी केवळ शाळेच्या इमारतीसमोरील छोटी जागा आहे. शास्त्रीनगर, तोरणानगर, जागृतीनगर यासह अन्य अशा छोट्या मोठ्या वसाहती आहेत. येथील मुलांना खेळण्यासाठी ही एक मुबलक जागा होऊ शकते. मात्र, सध्या येथे खेळण्यासाठी नव्हे तर फिरण्यासाठीची व्यवस्था नाही. परिणामी याकडे सर्वांचेचे दुर्लक्ष होत आहे. खडी आणि कचरा कोंडाळ्यामुळे या परिसरातून पुढे जाणेही नको वाटते. तरीही शार्टकट म्हणून पादचारी मार्ग तयार झाला आहे. 
वि. स. खांडेकर शाळेतील विद्यार्थ्यांना, या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी हे मैदान पुरेसे आहे. केवळ त्याची डागडुजी तातडीने करणे आवश्‍यक आहे. येथील कोंडाळा हलविला पाहिजे. मैदानात पसरलेली मोठी खडी तातडीने उचलली पाहिजेत. मैदान पुन्हा तयार केले पाहिजे. यासाठी लोकसहभाग आणि महापालिकेनेही प्रयत्न केले पाहिजेत. 

हे पण वाचा - सिंधुदूर्ग कारागृहात कैद्याचा का झाला मृत्यू....?

... तर मैदानाचे रुपडे पालटेल 
कक्कय विद्यालय, सुभाषनगर विद्यालय, नेहरुनगर विद्यालय या महापालिकेच्या शाळांचा परिसर नक्कीच आदर्श घेण्यासारखा आहे. वि. स. खांडेकर शाळेच्या मैदानालाही कंपाऊंड आहे. त्यामुळे येथे वृक्षारोपण होऊ शकते. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी, शाळेतील मुख्यध्यापक, शिक्षकांनी आणि समाजसेवकांनी पुढाकार घेतल्यास कोंडाळा झालेल्या मैदानाचे रुपडे नक्कीच पलटू शकेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT