Bad condition of Kolhapur-Ratnagiri highway 
कोल्हापूर

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाची दुरवस्था, रस्ता गेला खड्डयात 

शाम पाटील

शाहूवाडी : मलकापूर ते आंबा दरम्यानच्या कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने या राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्डयांचा आकार आणि संख्या पाहता हा महामार्ग खड्डयात गेल्याची स्थिती आहे. खराब रस्त्यांमुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. 

या मार्गावर वाहनांची दररोज मोठी वर्दळ असते. छोट्या वाहनांबरोबरच अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. सध्या मलकापूर ते आंबा दरम्यानच्या सुमारे 18 किलोमीटरच्या या रस्त्यात अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डयांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. सध्या या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साठले असून वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने खड्डयातून वाहने जातात व त्यातील पाणी उडून अन्य वाहनांवर उडते, त्यामुळे बऱ्याचदा वादाचे प्रसंगही उद्‌भवले आहेत. 

खड्डयांमुळे या मार्गावर अपघातही घडण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः दुचाकी चालकांचे प्रमाण अधिक आहे. या रस्त्यातील खड्डे तत्का बुजवण्याची मागणी वाहन धारकांतून होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 

दृष्टिक्षेप 
- मलकापूर ते आंबा दरम्यान 18 कि. मी. रस्ता 
- राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था 
- अपघातांचे प्रमाणही वाढले 
- खड्डे तत्काळ बुजवण्याची वाहनधारकांतून मागणी 

संपादन : प्रफुल्ल सुतार

कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : चिंचवड सब स्टेशन इथं ट्रान्सफर्मरला आग, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडीसह रावेतमध्ये विजपुरवठा खंडित

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT