Bambavade with Donoli stabbed the three crime marathi news 
कोल्हापूर

 डोणोली, बांबवडे तिघांवर चाकूचा वार; चर्चा बाजारपेठेत 

सकाळ वृत्तसेवा

बांबवडे  (कोल्हापूर) : डोणोली आणि बांबवडे तालुका  शाहुवाडी येथे जबरी दरोड्यात २ लाख  ९० हजार दोनशे पन्नास रुपयेंच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्यांनी तिघांवर चाकूचा वार करुन जखमी केले.  
     

याबाबत माहिती अशी 

रात्री  १.१५ ते २.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरांनी सौ. लक्ष्मी आनंदा शेळके यांच्या घरात घुसून हातातील सोन्याच्या पाटल्या कटरने कापून पळविल्या. यावेळी त्यांनी व त्यांचे पती आनंदा दादु शेळके  चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरांनी आनंदा शेळके यांच्या उजव्या दंडावर व तळ हातावर चाकूने वार केला. अशीच घटना बांबवडे येथे शाहुवाडी येथेही श्रीमती विजया पाटील या राहत असलेल्या घरावर अज्ञात चोरांनी दरोडा घातला.   मागच्या बाजूने घरात घुसून जबरदस्तीने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी विजया पाटील यांच्याही हातावर चाकूने वार केला. 

दोन्ही ठिकाणाच्या दरोड्यात सोन्याचा लक्ष्मी हार ,गंठण ( मनिमंगळसुत्र) सोन्याच्या दोन चेन, अंगठी व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला. यामध्ये लक्ष्मी शेळके यांचा १ लाख २० हजार सातशे पन्नास तर विजया पाटील यांच्या १ लाख ६९ हजार पाचशे रूपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.
यावेळी डोणोली गावातील प्रदीप सुदाम पाटील, विजय शहाजी कांबळे व त्यांच्या शेजारच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. 
   

घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती लाकडे, पोलीस उपअधिक्षक आर.आर. पाटील, पोलीस निरीक्षक विजय पाटील, यांनी घटनास्थळी पाहणी करुन भेट दिली. उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनी उपाधिक्षक कार्यालयाकडील विशेष पोलीस पथक कार्यन्वीत केले. यावेळी श्वानपथक, फाॅरेन्सीक व्हॅन पथक, सायबर पथक, यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी घटना स्थळाची पहाणी करत होते.

 आर. आर. पाटील यांनी शाहुवाडी तालुक्यातील खुटाळवाडी येथील खिंडीतील मिरची व्यापारी यांच्या गाडीवरील दरोडा, शित्तुर वारुन गुन्ह्यातील फरार आरोपी असे महत्वाच्या अनेक गुन्ह्यातील आरोपी चोवीस तासांत जेरबंद केले . याही गुन्ह्यातील आरोपी चोवीस तासांत आर आर पाटील यांच्या हाती लागतील अशी चर्चा बांबवडेतली बाजारपेठेत आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT